कोल्हापूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी वाहनांमध्ये गर्दी करण्यास मनाई असताना कोल्हापुरात मात्र महानगरपालिकेच्या केएमटी बसमध्ये लोंढेच्या लोंढे भरून वाहतूक होत आहे. त्याचा हा व्हिडीओ ईटीव्ही भारतच्या हाती लागला आहे. दरम्यान, सर्वसामान्य खासगी वाहनांना दंडुका दाखवणारे जिल्हा प्रशासन यावर कारवाई करणार का? हे पाहणे महत्वाचे आहे. सध्या या व्हिडीओची संपूर्ण कोल्हापूरात चर्चा आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या बसमध्ये तोबा गर्दी, कोरोना नियमांचा फज्जा - कोल्हापूर महानगरपालिका बस
कोल्हापूर महानगरपालिका संचलित असलेली केएमटी बसेस मात्र प्रवाशांनी तुडुंब भरून वाहतुक केली जात आहे. त्याचाच एक व्हिडीओ सध्या कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रवाशांनी भरलेली बस वाहतूक करताना आपल्याला पाहायला मिळते आहे.
![कोल्हापूर महानगरपालिकेच्या बसमध्ये तोबा गर्दी, कोरोना नियमांचा फज्जा बस गर्दी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12730326-455-12730326-1628590111264.jpg)
बस गर्दी
कोल्हापूर महानगरपालिकेच्या बसमध्ये तोबा गर्दी
हेही वाचा-'निर्बंध शिथिल मात्र आता जबाबदारी वाढली'
Last Updated : Aug 10, 2021, 3:55 PM IST