कोल्हापूर- बीएड आणि एमएडची पदवी अवघ्या साठ हजारात मिळेल, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाने दखल घेऊन पोलिसात तक्रार दिली आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कुलसचिव विलास नांदवडेकर यांनी केला आहे.
बीएड, एमएडची पदवी ६० हजाराला! व्हायरल मेसेजनंतर शिवाजी विद्यापीठाची पोलिसांत तक्रार - विद्यापीठात खळबळ उडाली
बीएड आणि एमएडची पदवी ६० हजारात मिळेल अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. याची दखल शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिवांनी घेत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
बीएड आणि एमएडची पदवी ६० हजारात मिळेल अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्या पोस्टवरील क्रमांकावर त्यांनी संपर्क केला. पोस्ट टाकणारी व्यक्ती नांदेडची असल्याचे समोर आले. त्या व्यक्तीने विद्यापीठाची बनावट डिग्री देत असल्याचे मान्य केले. मात्र भविष्यात काही अडचण आल्यास मी जबाबदार नाही असेही सांगितले.
या पोस्टमुळे विद्यापीठात खळबळ उडाली आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही परीक्षा नियंत्रक यांनी केले आहे. तसेच या बाबत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास नांदवडेकर यांनी पोलिसात सायबर सेलकडे फिर्याद दाखल केली आहे.