कोल्हापूर : सर्वत्र गणरायाचे आगमन झाले असून त्याची विविध रूपं आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेकांनी सुंदर आरास केली आहे तर अनेकांनी अनोख्या गणेशमूर्ती साकारल्या Making Ganesha idol from banana Kolhapur आहेत. कोल्हापुरातल्या आजरा तालुक्यातसुद्धा असचं एक मंडळ आहे जे गेल्या 25 वर्षांपासून विविध आकाराच्या आणि अनोख्या गणेशमूर्ती साकारत आले आहेत. यंदासुद्धा त्यांनी तब्बल 201 डझन केळींपासून सुंदर 11 फुटांची गणेशमूर्ती साकारली Ganesha idol made from 201 dozen bananas आहे. कोणतं आहे हे मंडळ आणि आजपर्यंत कोणकोणत्या गणेशमूर्ती त्यांनी साकारल्या आहेत पाहुयात, विशेष रिपोर्टमधून..
केळीपासून साकारले गणराज आणि नेसविला कोल्हापूरी फेटा :आजरा तालुक्यातील झुलपेवाडी या छोट्याशा गावात दोन गणेशमंडळे आहेत. त्यापैकी श्री हनुमान गणेश मंडळ झुलपेवाडी Shri Hanuman Ganesh Mandal Zhulpewadi हे गेल्या अनेक वर्षांपासून अनोख्या गणेशमूर्ती साकारणारे गणेशमंडळ म्हणून नावारूपास आले आहे. यंदा या मंडळाचा 25 वा गणेशोत्सव आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षात त्यांनी चक्क 201 डझन केळींपासून 11 फुटांची सुंदर गणेशमूर्ती 11 feet beautiful Ganesha idol made from 201 dozen bananas साकारली आहे. गावजवळच असलेल्या एका शेतकऱ्याकडून त्यांनी ही केळी खरेदी केली. ही मूर्ती साकारण्यासाठी त्यांना 3 ते 4 दिवस लागले. त्यानंतर एक सुंदर गणेशमूर्ती तयार झाली. या मूर्तीला कोल्हापूरी फेटाही नेसवला असल्याने या मूर्तीकडे डोळे भरून पाहात राहावे असे वाटते.