महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 15, 2020, 10:34 AM IST

Updated : Aug 15, 2020, 11:24 AM IST

ETV Bharat / city

जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार कुटुंबांचा लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न

जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या सर्वांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न
चौघांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कोल्हापूर -जमिनीच्या वादातून चार कुटुंबांतील सदस्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा प्रयत्न केला. अंगावर रॉकेल ओतून घेऊन या चार कुटुंबांनी आपल्या लहान मुलांसह पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांची धावपळ उडाली. विशेष म्हणजे, पालकमंत्री सतेज पाटीलही कार्यालयात उपस्थित होते. जिल्हा प्रशासन टोलवाटोलवी करत असल्याचा आरोप या कुटुंबीयांनी केला आहे. जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरून हा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या सर्वांना वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.

जमिनीच्या वादातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार कुटुंबांचा लहान मुलांसह आत्मदहनाचा प्रयत्न
आंदोलकांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचगाव रस्त्यावरील डिव्हिजन सर्वे क्रमांक तीनवरच्या एकाच प्लॉटच्या उताऱ्यावर तिघांची नावे नोंद झाली आहे. यासाठी पाचगाव ग्रामपंचायत, करवीर तहसील, प्रांत ऑफिसकडे याबाबत तक्रार केली आहे. बेकायदेशीर उतारा रद्द करावा, अशी मागणी या चार कुटुंबांतील लोक वारंवार करत आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सध्या या ठिकाणी एका समाजाच्या इमारत बांधण्याचे बांधकाम सुरू आहे. त्याला ग्रामपंचायत आणि तलाठी यांचा आशीर्वाद असल्याचा आरोपही या कुटुंबीयांनी केला आहे.वारंवार जिल्हा प्रशासनाकडे देखील याबाबत न्याय मागितला असता जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कुटुंबीयातील मारुती भालकर यांनी केला. न्याय मिळत नसल्याने आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाला कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन केले असल्याचे मारुती भालकर यांनी सांगितले.
Last Updated : Aug 15, 2020, 11:24 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details