महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'आशा' स्वयंसेविका आक्रमक; स्टेशन रोडवर ठिय्या

'आशा' सेविकांनी आक्रमक होत अचानक मुख्य स्टेशन रस्त्यावर ठिय्या मांडला. यामुळे जवळपास तासभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

आशा अंगणवाडी सेविकांनी आक्रमक होत अचानक मुख्य स्टेशन रस्त्यावर ठिय्या मांडला

By

Published : Sep 11, 2019, 8:41 PM IST

कोल्हापूर - 'आशा' अंगणवाडी सेविकांनी आक्रमक होत अचानक मुख्य स्टेशन रस्त्यावर ठिय्या मांडला. यामुळे जवळपास तासभर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

आशा अंगणवाडी सेविकांनी आक्रमक होत अचानक मुख्य स्टेशन रस्त्यावर ठिय्या मांडला

३ सप्टेंबर पासून आमचे शांततेत आंदोलन सुरू आहे. परंतु, आचारसंहिता लागू होण्याची वेळ आल्यानंरही सरकारची आश्वासने संपत नासल्याने आमचा संयम सुटला आहे, असे संघटनेच्या जिल्हाअध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा मानधनवाढीसाठी राज्यभरात 'आशा' कर्मचाऱ्यांचे आंदोलन...

काल (दि.११सप्टेंबर)ला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढला होता. पालकमंत्री म्हणून त्यांनी आमची जबाबदारी घ्यावी, अशी आमची इच्छा होती. परंतु, पक्षांमध्ये होत असलेल्या मेगा भरतीमध्ये शासन व्यस्त असल्याने आमच्यासारख्या महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार इच्छुक नसल्याने आम्ही सरकारचा तीव्र निषेध करतो, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा रत्नागिरीत आशा वर्कर्सची जोरदार निदर्शने, घोषणाबाजीने जिल्हा परिषद परिसर दणाणला

दरम्यान, 1 तासाहून अधिक काळ मुख्य रस्त्यावर रास्तारोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळानंतर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details