महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Pankaja Munde : बीड जिल्ह्यात चाललाय तसा कारभार ऊसतोड महामंडळात होऊ नये; पंकजांचा धनंजय मुंडेंना टोला - management should not be done in Ustod Corporation

ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी. तसेच, वैयक्तिक पातळीवर कोणीही जाऊन प्रचार करू नये असे मत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. त्या कोल्हापूर उत्तरमध्ये होत असलेल्या पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे
भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे

By

Published : Apr 7, 2022, 10:19 AM IST

Updated : Apr 7, 2022, 11:03 AM IST

कोल्हापूर - ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हायला हवी. तसेच, वैयक्तिक पातळीवर कोणीही जाऊन प्रचार करू नये असे मत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. त्या कोल्हापूर उत्तरमध्ये होत असलेल्या पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी कोल्हापूरमध्ये आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही चांगलेच टोले लगावले.

पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलताना

माझ्या शुभेच्छा आहेत - उसतोड कामगारांच्या महामंडळाची स्थापना झाली. त्यामध्ये आपला उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला असा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या माझ्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय बातमी होतच नाही हे धनंजय मुंडे यांना चांगले माहिती आहे असा टोला पंकजा यांनी यावेळी लगावला. तसेच, या महामंडळासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, बीड जिल्ह्यात जसा कारभार चालला आहे तसा कारभार त्यामध्ये करु नका असा टोमनाही त्यांनी मारला आहे.

वैयक्तिक पातळीवर प्रचार करू नये - शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर विचारले असता, मला वाटत भाजपचा स्थापना दिवस असल्याने ते दोघ नेते भेटले असावेत अस पंकजा यावेळी म्हणाल्या आहेत. दरम्यान, वैयक्तिक पातळीवर जाऊन कुणीही प्रचार करू नये, आपले पद, प्रतिष्ठा पाहून आपण प्रचार करावा असे म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

वैयक्तिक पातळीवर जाऊन प्रचार केला जात आहे - सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमध्ये सामान्य नागरिकांचे सर्व प्रश्न अडगळीत पडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मी ही निवडणूक जनतेच्या विकासाच्या मुद्द्यावर व्हावी म्हणून जनतेचे मुद्दे घेऊन प्रचार करणार आहे. तसेच, जनतेचे काम करणाऱ्यांना संधी मिळावी असे आवाहन करणार असल्याचही पंकजा यावेळी म्हणाल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून वैयक्तिक पातळीवर जाऊन प्रचार केला जात आहे. मात्र, मी स्वतः गेले अनेक वर्ष या राजकारणात आहे. तसेच, मुंडे साहेबांचे राजकारणही मी जवळून पाहिले आहे. त्यांनी अस कधीही केलेले नाही. असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.

आदर्श काम करणारे सरकार होते - राजकारणात वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलणार्‍यांला प्रतिष्ठा नसते. विकास म्हणले, की नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि महाराष्ट्रात पूर्वी असलेले फडणवीसांचे सरकार हे आदर्श काम करणारे सरकार होते. हे जनतेला पटवून देऊ असही त्या यावेळी म्हणाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी पुण्यात एका सभेत पंकजा मुंडे यांच्याबाबत गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार म्हणून त्यांनी ऊस कामगार मंडळाची स्थापना करायला हवी होती. मात्र, ते करू शकले नाहीत. त्याला उत्तर देताना धन्यवाद, की मला मुंडे साहेबांचे आपण वारसदार घोषीत केले त्याबद्दल असही पंकजा म्हणाल्या आहेत.

हेही वाचा -Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणात एकनाथ खडसेंना समन्स

Last Updated : Apr 7, 2022, 11:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details