कोल्हापूर -गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आलेल्या विरोधी आघाडीतले सर्वजन आता कट्टर विरोधक जरी असले तरी पुढे काहीही होऊ शकते असे माजी जेष्ठ संचालक अरुण नरके यांनी म्हंटले आहे. शिवाय तिसरी आघाडी होणे सुद्धा अशक्य असल्याचे विधान नरके यांनी केले आहे. गोकुळ निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज पार पडली. याच पार्श्वभूमीवर ते आज कोल्हापूरात पत्रकारांशी बोलत होते.
तिसरी आघाडी केवळ अशक्य; निवडणुकीपर्यंत अनेकजण इकडचे तिकडे अन् तिकडचे इकडे येतील - अरुण नरके मतांचे विभाजन झाल्यास फायदा कोणाला ?
गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी तिसरी आघाडी बनविणार असल्याचे म्हंटले होते. जर असे झाल्यानंतर मतांचे विभाजन झाल्यास फायदा कोणाला होईल असे विचारल्यानंतर गोकुळचे माजी जेष्ठ संचालक अरुण नरके यांनी तिसरी आघाडी होणे केवळ अशक्य आहे असे म्हंटले. त्यामुळे तिसरी आघाडी झाल्यास फायदा कोणाला होईल हा प्रश्नच राहुदेत असेही नरकेंनी म्हंटले आहे. दोन दिवसांपूर्वी महादेवराव महाडिक यांनी प्रकाश आवडे यांची भेट घेतली होती तर रविवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रकाश आवडे यांची भेट घेतली होती. त्यामुळे प्रकाश आवडे नेमके कोणासोबत राहणार ? की तिसऱ्या आघाडी बनविणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूकीपर्यंत अनेकजण तिकडचे इतके तर इकडचे तिकडे जाण्याची शक्यता -
सहकारात काहीही होऊ शकते. तिकडून सुद्धा प्रयत्न चालले आहेत आणि इकडून सुद्धा प्रयत्न चालले आहेत. अनेक जण नाराज होऊन इकडून तिकडे येत असतात. त्यामुळे निवडणुकीपर्यंत अनेकजण इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे आल्याचे पाहायला मिळेल असेही अरुण नरके यांनी यावेळी म्हंटले आहे.
मग उमेदवारी कार्यकर्त्याला का दिली नाही ?
पत्रकारांशी बोलताना अरुण नरके यांनी आपण स्वतः गोकुळ मधून निवृत्ती जाहीर केली आहे. आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला कधी थांबायचे आहे हेच सांगत माझ्यावर दूध उत्पादक आणि अनेक संस्थांचे खूप मोलाचे उपकार असल्याचे त्यांनी म्हंटले. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून मी या ठिकाणी संचालक म्हणून काम करतोय शिवाय 10 वर्ष चेअरमन म्हणून सुद्धा काम केले आहे असेही नरकेंनी सांगितले. यावर उत्पादकांचे आपल्यावर इतके उपकार आहेत, सांगत आहात मग आपण उमेदवारी सामान्य कार्यकर्त्याला का दिली नाही ? हे विचारल्यानंतर अरुण नरके म्हणाले, उमेदवारी ही कार्यकर्त्यालाच मिळते पण त्याची प्रसिद्धी किती आहे ? त्याच्याकडे पैशाची ताकद किती आहे ? किंव्हा त्याला व्यसन कुठले आहे का हे सुद्धा पाहिले जाते असे म्हणत त्यांनी वेळ मारून नेली. दरम्यान, अरुण नरके यांनी आपले चिरंजीव चेतन नरके यांचा उमेदवारी अर्ज भरला आहे.