कोल्हापूर - डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफी नंतर आता 'ॲपल' ने सुद्धा कोल्हापूरच्या फोटोग्राफरची ( Apple notice Kolhapur photographer Prajwal Chowgule ) दखल घेतली आहे. प्रज्वल चौगुले, ( Kolhapur photographer Prajwal Chowgule ) असे या फोटोग्राफरचे नाव असून त्याने काढलेल्या एका फोटोची 'ॲपल' मायक्रो चॅलेंजमध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे, जगभरातून आलेल्या हजारो फोटोंमध्ये केवळ 10 जणांचे फोटो निवडण्यात आले असून, त्यामध्ये प्रज्वल चौगुले याचा कोष्टीच्या जाळ्यावर दवबिंदू ( Prajwal Chowgule photography ) असलेला सुंदर फोटो निवडण्यात आला आहे. जगभरातील 10 मध्ये प्रज्वल ( Apple select Prajwal Chowgule photo ) हा एकटा भारतीय ठरला असल्याने ही कोल्हापूरकरांसाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे.
नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरीवरसुद्धा प्रज्वलचा फोटो झळकला : तदरम्यान, प्रज्वल चौगुलेने ( Kolhapur Prajwal Chowgule news ) काढलेल्या फोटोंची यापूर्वी अनेकांनी दखल घेतली आहे. विशेष म्हणजे, नॅशनल जिओग्राफी, डिस्कव्हरीवरसुद्धा त्याचा फोटो झळकला आहे. येथील ज्योतिबा डोंगर परिसरातील एका फार्म हाऊसचा काढलेला सुंदर फोटो डिस्कव्हरीने आपल्या वेबसाईटसह सोशल मीडियाच्या अकाऊंटवर प्रसिद्ध केला आहे. त्याच पद्धतीने प्रज्वलने मातीच्या विटा बनविण्याच्या प्रक्रियेचे फोटो काढले होते. यामध्येच त्याने एका महिला कामगाराचा काढलेला फोटो नॅशनल जिओग्राफीने प्रसिद्ध केला. त्यानंतर आता 'ॲपल' ने ( Apple select Prajwal Chowgule photo ) सुद्धा कोल्हापूरच्या प्रज्वलच्या फोटोग्राफीची दखल घेतली असून, ही संपूर्ण कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे, 'ॲपल' ने निवडलेले 10 फोटो आपल्या कार्यालयातील फोटो गॅलरीमध्ये फ्रेम करून लावले आहेत.