महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आज राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा; सतेज पाटील, महाडिक पुन्हा आमने सामने - Rajaram karkhana sabha

राजाराम सहकारी साखर कारखान्याची ( Rajaram Cooperative Sugar Factory ) वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. जिल्ह्यातील निवडणुका आणि गोकुळ च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महाडिक गटाची धोबीपछाड ( crises in Satej Patil and Mahadik group ) करत सत्तांतर घडवून आणले असल्याने जिल्ह्यात सध्या सतेज पाटील यांचा वर्चस्व पाहायला मिळत आहे दरम्यान आज होणारी ही सभा गोकुळ प्रमाणेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा सुरू आहे.

Rajaram karkhana sabha
राजाराम सहकारी साखर कारखाना

By

Published : Sep 30, 2022, 10:31 AM IST

कोल्हापूर : राजाराम सहकारी साखर कारखान्याची ( Rajaram Cooperative Sugar Factory ) वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे. यामुळे पुन्हा एकदा सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक हे आमने सामने येणार आहेत. सध्या राजाराम कारखान्यात महाडिक गटाची सत्ता आहे. दरम्यान सत्ता परिवर्तन करण्यासाठी सतेज पाटील यांचा प्रयत्न सुरू असून यंदाची ही शेवटची सर्वसाधारण सभा होत आहे. यामुळे सतेज पाटील गटाच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने ( Rajarshi Shahu Transformation Alliance ) सत्ताधाऱ्यांना घेरण्याची पूर्ण तयारी केली असून याच पार्श्भूमीवर विरोधकांची बैठक ही पार पडली आहे. जिल्ह्यातील निवडणुका आणि गोकुळ च्या निवडणुकीत सतेज पाटील यांनी महाडिक गटाची धोबीपछाड ( crises in Satej Patil and Mahadik group ) करत सत्तांतर घडवून आणले असल्याने जिल्ह्यात सध्या सतेज पाटील यांचा वर्चस्व पाहायला मिळत आहे. दरम्यान आज होणारी ही सभा गोकुळ प्रमाणेच वादळी ठरणार असल्याचे चर्चा सुरू आहे.

सत्ताधार्याना घेरण्याची तयारी पूर्ण :श्री राजाराम सहकारी साखर कारखान्याची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडणार असून सध्या राजाराम कारखान्यात महाडिक गटाची सत्ता आहे. गोकुळ नंतर आता राजाराम कारखान्यातील महाडिकयांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत.या सर्वसाधारण सभेसाठी सतेज पाटील आणि महाडिक आज पुन्हा एकमेकांन समोर उभे राहणार असून गेल्या काही दिवसांपूर्वी सतेज पाटील यांनी महाडिक गटाच्या 1346 सभासदांना न्यायालयात अपात्र ठरवत महाडिकाना धक्का दिला असून आज ही सत्ताधाऱ्यांना विविध प्रश्नांवर घेरण्याची संपूर्ण तयारी सतेज पाटील गटानी केली आहे. यामुळे राजाराम कारखान्याची शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा ही वादळी ठरणार आहे.


7/12 वर अमल महाडिक याचे नाव लावायचे नसेल, तर परिवर्तन घडवूया: राजाराम कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्भूमीवर सतेज पाटील गटाची रणनीतीचा भाग म्हणून बैठक पार पडली. यावेळी सतेज पाटील यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना शुक्रवारची सभा माजी आमदार महादेवराव महाडिक व त्यांच्या संचालकांची शेवटची सभा असेल. ही सभा व्यवस्थित पार पाडून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहूया. राजाराम कारखान्याचे 1346 सभासद न्यायालयाने अपात्र ठरविले. परिवर्तनाची पहिली लढाई आपण जिंकलो आहोत. त्यामुळे राजाराम कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी सभासदांनी सज्ज राहावे. राजाराम कारखान्याच्या 7/12 वर अमल महाडिक याचे नाव लावायचे नसेल, तर परिवर्तन घडवूया असे सांगत महाडिक गटावर त्यांनी हल्लाबोल केला आहे.


कारखान्याला आमचे नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही :माजी आमदार आणि संचालक अमल महाडिक यांनी ही सतेज पाटील यांच्या या वाक्याला प्रतिउत्तर देत कारखान्याला आमचे नाव लावायला आम्ही काही सतेज पाटील नाही. रात्रंदिवस फक्त ७/१२ आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का ? असा प्रश्न मला पडतो असा टोला माजी आमदार अमल महाडिक यांनी लगावला आहे. दरम्यान सभेपूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांची एकमेकांनवर टीका सुरू झाल्याने आजची ही शेवटची सभा वादळी ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details