महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Anand mahindra share photo बॅरलवर चढून तिरंगा फडकवणाऱ्या आजींचा आनंद महिंद्रानी शेअर केला फोटो म्हणाले

आनंद महिंद्रा यांनी एक फोटो पोस्ट केला Anand mahindra share photo आहे ज्यामध्ये एक वयोवृद्ध आजी आजोबा हर घर तिरंगा मोहिमेला पाठिंबा देत आपल्या Anand mahindra share photo of elderly couple घरावर तिरंगा फडकवत आहेत. कोल्हापुरातील उचगाव परिसरात राहणाऱ्या या वयोवृद्ध दाम्पत्याचा Elderly couple hoisting national flag in kolhapur फोटो सर्वत्र व्हायरल झाला. त्याची स्वतः आनंद महिंद्रा यांनी दखल घेतली आहे.

elderly couple hoisting national flag in kolhapur
आनंद महिंद्रा यांनी कोल्हापूर येथील आजीचा फोटो शेअर केला

By

Published : Aug 17, 2022, 11:21 AM IST

कोल्हापूरकाही दिवसांपूर्वी आनंद महिंद्रा Anand mahindra share photo यांनी त्यांच्या वाढदिवसाला कोल्हापूरातील काही दिव्यांग मुलांनी Anand mahindra share photo of elderly couple फळ्यावर सुंदर चित्र काढून शुभेच्छा दिल्या होत्या. त्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी या आपल्या आयुष्यातील सर्वात चांगल्या elderly couple hoisting national flag in kolhapur शुभेच्छा आहेत म्हणत त्यांचे कौतुकही केले होते. आता पुन्हा एकदा आनंद महिंद्रा यांनी एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक वयोवृद्ध आजी आजोबा हर घर तिरंगा मोहिमेला पाठिंबा देत आपल्या घरावर तिरंगा फडकवत आहेत. कोल्हापुरातील उचगाव परिसरात राहणाऱ्या या वयोवृद्ध दाम्पत्याचा Anand mahindra share photo of old women hoisting flag फोटो सर्वत्र व्हायरल झाला. त्याची स्वतः आनंद महिंद्रा यांनी दखल घेतली आहे. कोण आहेत हे आजी आजोबा जाणून घेऊया.

हेही वाचाEknath Shinde order to BMC मराठी शिक्षकांचे प्रश्न मार्गी लागणार मुख्यमंत्र्यांचे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना प्रश्न सोडवण्यासाठीचे आदेश

घरात शिडी नसल्याने बॅरलवर चढून तिरंगा फडकवलाआनंद महिंद्रा यांनी जो आजी आजोबांचा तिरंगा फडकवितानाचा फोटो आपल्या ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे तो फोटो कोल्हापूर शहरालगत असलेल्या उचगावमधील आहे. हिंदुराव दत्तू पाटील आणि रुक्मिणी हिंदुराव पाटील, असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला हर घर तिरंगा मोहिमेत सहभाग घेऊन आपापल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हे वृद्ध दाम्पत्य सुद्धा घरावर तिरंगा फडकवताना दिसले. विशेष म्हणजे, घरात शिडी नसल्याने एका बॅरलवर चढून आजींनी तिरंगा फडकवला. शिवाय त्या बॅरलला आजोबांनी घट्ट पकडले असल्याचे दिसते.

फोटो सर्वत्र व्हायरलस्वातंत्र्यदिनादिवशी हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला होता. तोच फोटो आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत पोहोचला. ते नेहमीच अशा विविध आवडलेल्या गोष्टी शेअर करत असतात. त्यांनी हा फोटो सुद्धा शेअर केला आहे. शिवाय स्वातंत्र्यदिनानिमित्त जी लोक खूपच चुकीच्या चर्चा करत आहेत त्यांनी या वृद्ध दाम्पत्यांना विचारा. एखाद्या व्याख्यानापेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने हे समजावू शकतील, असे त्यांनी या फोटोसोबत कॅप्शन दिले आहे. याच परिसरात राहणाऱ्या विक्रम चौगुले यांनी हा सुंदर क्षण आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला.

हेही वाचाMohit Kamboj tweet राष्ट्रवादीचा कोणता नेते तुरुंगात जाणार मोहित कंबोज यांच्या ट्विटने तापले राजकारण

ABOUT THE AUTHOR

...view details