कोल्हापूर -पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस अखिल भारतीय नौजवान सभेच्यावतीने बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. यावेळी भीक मांगो आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करण्यात आली. देशात बेरोजगारीचे संकट वाढत असताना मोदी सरकारने खासगीकरण सुरू केले आहे. कोरोनामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आहेत. हे संकट कायम राहिल्यास बेरोजगार तरुण रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सभेने दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सत्ता आल्यापासून देशात बेरोजगारीचा प्रमाण वाढले आहे. सत्तेत येण्यापूर्वी याच पंतप्रधानांनी दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करण्याचे आश्वासन तरुणांना दिले होते. मात्र, या तरुणांची आज फसवणूक झाली आहे. रेल्वेसह आठ शासकीय संस्थांच्या खासगीकरण सुरू आहे, देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून देशातील बेरोजगारीचा 22 टक्क्यांवरून 40 टक्क्यांवर आला आहे, असा आरोप गिरीश फोंडे यांनी यावेळी केला.