महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Miraj Kolhapur Passenger Train : तब्बल दोन वर्षांनंतर कोल्हापूर मिरज पॅसेंजर सुरू - कोरोना

कोरोनामुळे बंद झालेली कोल्हापूर मिरज पॅसेंजर रेल्वे ( Kolhapur Miraj Passenger Train ) तब्बल दोन वर्षांनंतर आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर झाली आहे. यापूर्वीच अनेक नागरिकांनी रेल्वे सेवा सुरू करा, अशी मागणी केली होती. आता पॅसेंजर सेवा ( Miraj Kolhapur Passenger Train ) सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय पूर्वीप्रमाणे नियमित ही सेवा सुरू असणार असून त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Apr 14, 2022, 5:14 PM IST

कोल्हापूर - कोरोनामुळे बंद झालेली कोल्हापूर मिरज पॅसेंजर रेल्वे ( Kolhapur Miraj Passenger Train ) तब्बल दोन वर्षांनंतर आजपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची होत असलेली गैरसोय दूर झाली आहे. यापूर्वीच अनेक नागरिकांनी रेल्वे सेवा सुरू करा, अशी मागणी केली होती. आता पॅसेंजर सेवा ( Miraj Kolhapur Passenger Train ) सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय पूर्वीप्रमाणे नियमित ही सेवा सुरू असणार असून त्याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अशी असेल पॅसेंजरची वेळ -तब्बल 2 वर्षांनंतर आता कोल्हापूर मिरज पॅसेंजर सेवा सुरू झाल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत होता. दररोज कोल्हापूरहून मिरज आणि मिरजहून कोल्हापूरला येणाऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यामुळे ही सेवा सुरू झाल्याने प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. ही पॅसेंजर दररोज कोल्हापुरातून सकाळी 10:30 वाजता सुटणार असून ती सकाळी 11:45 वाजता मिरजेत पोहोचेल तर दुपारी 02:14 वाजता मिरज येथून सुटून दुपारी 03:30 वाजता कोल्हापुरात पोहोचणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी पुन्हा एकदा या सेवा सुरू झाल्या असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, यानंतर मिरज पंढरपूर मार्गावरील पॅसेंजर, कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस तसेच कोल्हापूर मुणुगुरू एक्सप्रेस रेल्वे पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

हेही वाचा -अपहरण झालेल्या 'त्या' व्यापाऱ्याचा खून; मृतदेह पुरून त्यावर ठवले होते दगड

ABOUT THE AUTHOR

...view details