कोल्हापूर - पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोल्हापुरातील पंचगंगा नदीमध्ये एक तरुण, तर शाहूवाडी कडवे धरणात एक जण बुडून मृत्यू झाला आहे. बातमी कळताच घटनास्थळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी शोधकार्य सुरू केले. तीन तासाच्या शोध मोहिमेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने दोन्ही मृतदेह बाहेर काढले आहेत. यातील एकाची ओळख पटली असून, दुसऱ्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
आडवे धरणात बुडून एकाचा मृत्यू -
पोहायला गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली आहे. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील आडवे धरणात एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचे नाव मारुती माणिक तिवारी असून त्याचे वय 41 असल्याचे आपत्ती व्यवस्थापनकडून सांगण्यात आले आहे. तसेच तो मूळचा कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील चावरली गावातला असल्याचे समोर आले आहे. सदरचा व्यक्ती हा शाहूवाडी तालुक्यातील आडवे धरणात पोहण्यास गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला आहे.