महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ABVP Agitation At Kolhapur University : ऑनलाईन परीक्षा न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभाविपचे विद्यापीठात आंदोलन - अभाविपचे आंदोलन शिवाजी विद्यापीठ

ऑनलाईन परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षेस मुकावे लागले होते. या परीक्षा पुन्हा घेण्यासंदर्भात मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी सकारात्मक निर्णय दिला होता. तरीही देखील शिवाजी विद्यापीठाने उदय सामंत यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. यामुळे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी विद्यापीठावर मोर्चा ( ABVP Agitation At Kolhapur University Campus ) काढत ठिया आंदोलन केल.

ABVP Agitation At Kolhapur University
ABVP Agitation At Kolhapur University

By

Published : Mar 21, 2022, 5:00 PM IST

Updated : Mar 21, 2022, 7:21 PM IST

कोल्हापूर -शिवाजी विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली ( ABVP Agitation In Shivaji University ) आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑनलाइन क्लस्टर पद्धतीने पार पडल्या होत्या. मात्र, यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षेस मुकावे लागले होते. मात्र. या परीक्षा पुन्हा घेण्यासंदर्भात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत ( Uday Samant ) यांनी सकारात्मक निर्णय दिला होता. तरीही देखील शिवाजी विद्यापीठाने उदय सामंत यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांच्या समवेत शिवाजी विद्यापीठावर मोर्चा ( ABVP Agitation At Kolhapur University Campus ) काढत ठिया आंदोलन केले.

प्रतिक्रिया

विद्यापीठाच्या दारात विद्यार्थ्यांचे आंदोलन -

विद्यापीठाच्या परीक्षा सॉफ्टवेअरमध्ये अनेक त्रुटी असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षांना मुकावे लागला आहे. त्यामुळे संबधित महाविद्यालयांकडे विद्यार्थ्यांनी अर्जाद्वारे तक्रार देखील दाखल केली आहे. मात्र तरीदेखील शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नुकसानीला सर्वस्वी विद्यापीठ जबाबदार असल्याचा आरोप करत आज विद्यार्थ्यांनी प्रभारी परीक्षा नियंत्रक आणि त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करत जोरदार आंदोलन केला आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचणी आल्या आहेत. अशांना पुन्हा एकदा संधी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

कोरोना संसर्गामुळे गेली दोन ते अडीच वर्ष विद्यापीठाच्या परीक्षा हा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या ऑक्टोंबर नोव्हेंबर हिवाळी परीक्षा 2021 च्या परीक्षादेखील ऑनलाईन व क्लस्टर पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अनेक तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागले होते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाहीत. तसेच अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे लिंक न येणे तसेच इंटरनेट प्रॉब्लेम तसेच परीक्षा देताना सॉफ्टवेअरमधूनच बंद होणे, अशा अनेक तांत्रिक समस्यां आल्याने विद्यार्थ्यांना पेपर देता आले नाही. याचा परिणाम हा निकालात दिसून आला. यामध्ये अनेकांचे निकाल लागले असून या निकालात विद्यार्थी असल्याचे विद्यापीठामार्फत दाखवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात आले आहे. तर संबंधित महाविद्यालयांना याबाबत विचारले असता, हात वर करत असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून आज शिवाजी विद्यापीठात जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच यावेळी तांत्रिक कारणामुळे परीक्षा न देता आलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेची संधी मिळावी, या आशयाचे पत्र विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले.

राज्य सरकारच्या आदेशाला विद्यापीठाची केराची टोपली -

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या खात्यात हा ऑनलाइन परीक्षा घेत असताना तांत्रिक कारणास्तव विद्यार्थ्यांना परीक्षा देता आल्या नाही तर त्यांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून द्यावी असे परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते मात्र शिवाजी विद्यापीठाने या आदेशाला केराची टोपली दाखवली असून विद्यार्थ्यांचे नुकसान करत आहेत. विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्यात आले असून अनेक विद्यार्थ्यांना संबंधित न देता आलेल्या परीक्षेला अब्सेंट चे रीमार्क पडले आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याची हकालपट्टी करा व ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आले नाहीत अशांना परीक्षेची पुन्हा एकदा संधी द्या अशी मागणी केली आहे आता यावर विद्यापीठ काय निर्णय घेते तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे या विद्यार्थ्यांची दखल घेणार काय हे पहावे लागणार आहे.

हेही वाचा -Onion Market price in Lasalgaon : लासलगाव बाजारात कांद्याचा भाव घसरला; शेतकरी हतबल

Last Updated : Mar 21, 2022, 7:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details