कोल्हापूर - पदवीधरांना त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता नाही. आता जे नेते निवडणूक लढवत आहेत ते पक्षाच्या हाताखाली काम करणारे नेते आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांशी यांना काहीही देणे घेणे नाही, असे पुणे पदवीधर मतदारसंघातील साताऱ्याचे उमेदवार, बिग बॉस मराठी फेम अजिभिज बिचुकले यांनी म्हटले आहे. निवडणुकीच्या प्रचारार्थ ते कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते.
कोण आहे अभिजित बिचुकले -
अभिजित बिचुकले पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात राहतात. आजवर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी त्यांनी बरेचसे स्टंट केले आहेत. अभिजित यांनी आजवर बऱ्याच निवडणुका लढवल्या आहेत. मात्र, दरवेळी अपयश आले आहे. महाराष्ट्राचा २०१९ चा मुख्यमंत्री मीच ठरवणार, या वक्तव्याने देखील ते चर्चेत आले होते. त्याचे बरेचसे बॅनरही लावण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरताना त्यांनी अनामत रक्कम भरताना चक्क १२ हजार ५०० रुपयांची चिल्लर जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली होती. अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ते प्रसिद्धी झोतात आले होते.
हेही वाचा-महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती, सरकारने वर्षभरात घेतले 'हे' महत्वाचे निर्णय
हेही वाचा -महाविकास आघाडी सरकार वर्षपूर्ती: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची 'विशेष मुलाखत'