महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Protest Against Agnipath : अग्निपथ योजनेला कोल्हापूरातूनही विरोध; 'आप' ने मोदींना पाठवली रक्ताने लिहीलेली पत्र - AAP Letter To PM Modi By Blood in Kolhapur

कोल्हापूर - केंद्र सरकारने ( Central Government ) नुकतीच युवकांसाठी अग्निपथ योजना जाहीर केली. भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी या योजनेला जोरदार विरोध केला आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहेत. आता कोल्हापुरातून सुद्धा या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. या योजनेचा पुनर्विचार करून ही योजना मागे घ्यावी यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्ताचे पत्र ( letter to Modi written in blood ) लिहून विनंती केली आहे. 'शाश्वत रोजगार द्या, 'अग्निपथ' मागे घ्या' या आशयाचे पत्र 'आप' युवा आघाडीने मोदींना लिहले आहे. कोल्हापूरातील बिंदू चौक येथे त्यांनी आंदोलन करत पत्र पाठवली.

protest against agnipath
protest against agnipath

By

Published : Jun 18, 2022, 10:22 PM IST

कोल्हापूर - केंद्र सरकारने ( Central Government ) नुकतीच युवकांसाठी अग्निपथ योजना जाहीर केली. भरतीची तयारी करणाऱ्या युवकांनी या योजनेला जोरदार विरोध केला आहे. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन सुरू आहेत. आता कोल्हापुरातून सुद्धा या योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. या योजनेचा पुनर्विचार करून ही योजना मागे घ्यावी यासाठी आम आदमी पार्टी युवा आघाडीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्ताचे पत्र ( letter to Modi written in blood ) लिहून विनंती केली आहे. 'शाश्वत रोजगार द्या, 'अग्निपथ' मागे घ्या' या आशयाचे पत्र 'आप' युवा आघाडीने मोदींना लिहले आहे. कोल्हापूरातील बिंदू चौक येथे त्यांनी आंदोलन करत पत्र पाठवली.

काय म्हटले आहे पत्रात ? -आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे की, अग्निपथ योजनेचा पुनर्विचार होऊन भरती प्रक्रियेसाठी उत्सुक असलेल्या युवकांशी, संसदेतल्या संरक्षण समितीवर असलेल्या सदस्यांशी तसेच भारतीय सैन्यातील आजी-माजी अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करूनच यावर निर्णय घेण्यात यावा. तोपर्यंत ही योजना मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली असल्याचे युवा शहराध्यक्ष मोईन मोकाशी यांनी सांगितले. गेली दोन वर्षांपासून रखडलेली सैन्य भरती त्वरित सुरू करावी. रखडलेल्या सैनिक भरतीमुळे वयोमर्यादा उलटलेल्या युवकांना संधी वाढवून मिळावी या मागण्या देखील पत्रात नमूद केल्या आहेत.

मोदींनी राष्ट्रहिताचा विचार करून ही योजना मागे घ्यावी -यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, भारतीय सैन्याची शिस्तबद्धता अबाधित राखून, योग्य मानसन्मान व सेवेची शाश्वती असलेली योजना तयार करून सैन्य भरती करण्यात यावी. भरतीसाठी इच्छुक युवकांवर, तसेच सैन्याच्या मनोबलावर या योजनेचा होणारा परिणाम लक्षात घेत मोदींनी राष्ट्रहिताचा विचार करून ही योजना मागे घ्यावी. पंतप्रधान मोदींना या पत्राद्वारे 'आप' युवा आघाडीने विनंती केली आहे. यावेळी उत्तम पाटील, मोईन मोकाशी, सूरज सुर्वे, आदम शेख, राज कोरगावकर, प्रथमेश सूर्यवंशी, मयूर भोसले, अभिजित कांबळे, विजय हेगडे, बसवराज हदीमनी, भाग्यवंत डाफळे, शकील मोमीन आदी उपस्थित होते.

हेही वाचा -Agneepath Scheme Protest : 'अग्निपथ'चे लोन महाराष्ट्रात, सोलापूर रेल्वे स्थानकावर तरुणांचे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details