कोल्हापूर - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर, भाऊ संजय पाटील यड्रावकर यांच्यासह चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांवर गुन्हा ( case registered against Rajendra Patil Yadravkar ) दाखल झाला आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर यड्रावकर यांनी जल्लोष करत मिरवणूक काढली होती. यावेळी कोविड - 19 नियम मोडल्यामुळे जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्यासह सुमारे 400 ते 500 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर हेही वाचा -Kolhapur Corporation Vehicle Accident : कोल्हापूर महापालिकेच्या चारचाकी वाहनाची धडक लागल्याने ४ वर्षीय बालिकेचा मृत्यू
पोलीस प्रशासनाचे सर्वसामान्य नागरिकांमधून कौतुक :
दरम्यान, आरोग्य राज्यमंत्र्यांना नियम वेगळा आहे का? असे म्हणत अनेकांनी टीका केली होती. सोशल मीडियातसुद्धा याबाबत तरुणांनी कारवाईची मागणी केली होती. ईटीव्ही भारतने सुद्धा याबाबतचे वृत्त प्रसारित केले होते. त्यानंतर आज आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह चारशे ते पाचशे कार्यकर्त्यांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईमुळे पोलिसांचे कौतुक होत आहे.
ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते वृत्त:
निवडणूक निकाल लागल्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषाबाबत 'ईटीव्ही भारत'ने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर पोलिसांनी सुद्धा सर्वांना नियम समान म्हणत यड्रावकर यांच्यासह 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -आरोग्य राज्यमंत्र्याकडून कोविड नियम पायदळी; विना मास्क आनंदोत्सव साजरा केला, नेटकरी म्हणाले...