कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणुकीसाठी ( Kolhapur North By-Election Voting ) आज सकाळी सात ते सायंकाळी सहा या कालावधीत 357 मतदान केंद्रावर एकूण 60.09 टक्के मतदान ( 60 Percent Voting Kolhapur By election ) झाले. निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, या निवडणुकीसाठी एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये भाजपकडून सत्यजित कदम ( BJP Candidate Satyajeet Kadam ) तर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव ( MVA Candidate Jayashri Jadhav ) रिंगणात होत्या. दोन्ही पक्षांकडून मागील 15 दिवसांपासून जोरदार प्रचार सुरू होता. अनेक दिग्गज नेते कोल्हापूरात प्रचारासाठी आले होते. आज चुरशीने 60.09 टक्के मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ( BJP Leader Chandrakant Patil ) तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील ( Minister Satej Patil ) या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मतदारराजा कोणाला कौल देणार हे येत्या 16 एप्रिल रोजी समजणार आहे.
दिवसभरात अशा पद्धतीने मतदान :आज सकाळी 7 वाजल्यापासून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेस शांततेत सुरुवात झाली. सकाळी 7 ते 9 या कालावधीत 6.96 टक्के, सकाळी 11 वाजेपर्यंत 20.57 टक्के, दुपारी 1 पर्यंत 34.18 टक्के, तर दुपारी 3 वाजेपर्यंत 44.93 टक्के, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.26 टक्के मतदान, तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत एकूण अंदाजित 60.09 टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच 2 लाख 91 हजार 798 मतदारांपैकी 1 लाख 75 हजार च्या आसपास मतदान झाले आहे.
वयोगटानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे :कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 798 मतदार आहेत. त्यापैकी 1 लाख 45 हजार 768 हे पुरुष मतदार, तर 1 लाख 46 हजार 068 स्त्री मतदार आहेत. 12 तृतीयपंथी मतदार आहेत. तर, सैन्य दलातील मतदाराची संख्या ही 95 इतकी आहे.