महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरात शुक्रवारी दिवसभरात नवे 47 कोरोनाबाधित, एकूण आकडा 483

सद्या सर्वात कमी रुग्ण हातकणंगले तालुक्यात 5 इतके आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरातील रुग्णांची संख्या केवळ 20 इतकी आहे.

kolhapur corona
कोल्हापुरात शुक्रवारी दिवसभरात नवे 47 कोरोनाबाधित

By

Published : May 30, 2020, 8:09 AM IST

कोल्हापूर- रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण 47 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 483 वर पोहोचली आहे. तर, एक दिलासादायक बातमीसुद्धा आहे. शुक्रवारी दिवसभरात एकूण 27 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 118 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत एकूण 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सद्या जिल्ह्यात 361 अॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे शाहूवाडी तालुक्यातील असून त्यांची संख्या 143 वर पोहोचली आहे. दिवसभरात सर्वाधिक रुग्ण चंदगड तालुक्यातील आढळले आहेत. दिवसेंदिवस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांची चिंता आणखीनच वाढली आहे. शुक्रवारी सकाळपासून एकूण 359 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 47 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, इतर सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सद्या सर्वात कमी रुग्ण हातकणंगले तालुक्यात 5 इतके आहेत. विशेष म्हणजे कोल्हापूर शहरातील रुग्णांची संख्या केवळ 20 इतकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details