महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरात तब्बल 32 जणांचा मृत्यू, 969 नवे कोरोनाबाधित - Vaccination in kolhapur

बुधवारी दिवसभरात 562 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 250 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 65 हजार 603 इतकी झाली आहे

कोल्हापुरात तब्बल 32 जणांचा मृत्यू
कोल्हापुरात तब्बल 32 जणांचा मृत्यू

By

Published : Apr 29, 2021, 11:43 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्णसंख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाणात ही वाढ होत आहे. गेल्या 24 तासात तर कोल्हापुरात तब्बल 32 जणांचा मृत्यू झाला. तर 969 नवे रुग्ण आढळले आहेत. बुधवारी दिवसभरात 562 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजार 250 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 65 हजार 603 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 65 हजार 603 वर पोहोचली आहे. त्यातील 55 हजार 175 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 8 हजार 250 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 2 हजार 178 झाली आहे.

वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1 वर्षाखालील - 82 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 2357 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 4643 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 35712 रुग्ण
51 ते 70 वर्ष -18238 रुग्ण
71 वर्षांवरील - 4571 रुग्ण

जिल्ह्यात असे एकूण 65 हजार 603 रुग्ण झाले आहेत.

तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

1) आजरा - 1279
2) भुदरगड - 1669
3) चंदगड - 1434
4) गडहिंग्लज - 2020
5) गगनबावडा - 228
6) हातकणंगले - 6715
7) कागल - 2012
8) करवीर - 7420
9) पन्हाळा - 2439
10) राधानगरी - 1474
11) शाहूवाडी - 1781
12) शिरोळ - 3235
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 9232
14) कोल्हापुर महानगरपालिका - 21079
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 3586

ABOUT THE AUTHOR

...view details