कोल्हापुरात 299 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णांपैकी पंधराशे घेतायत घरातूनच उपचार
कोल्हापूरात 299 नवे रुग्ण आढळले आहेत. सक्रिय रुग्णांपैकी पंधराशे रुग्ण घरातूनच उपचार घेत आहेत.
कोल्हापूर
By
Published : Apr 14, 2021, 4:45 PM IST
कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली. गेल्या 24 तासांत 299 नवे रुग्ण तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 181 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2521वर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 2 इतकी झाली आहे. विशेष म्हणजे एकूण अॅक्टिव्ह 2 हजार 521 रुग्णांपैकी ग्रामीण आणि नगरपालिका क्षेत्रात 911 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत, तर कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात 505 रुग्ण घरातून उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 55 हजार 2वर पोहोचली आहे. त्यातील 50 हजार 653 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021ला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 521 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1 हजार 828 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण तसेच मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.