कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी दिवसभरात 288 नवे रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी दिवसभरात 89 जणांना डिस्चार्जसुद्धा देण्यात आला आहे. सद्यस्थिती जिल्ह्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1464 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 53 हजार 273 इतकी झाली आहे. मंगळवारीसुद्धा 231 कोरोना रुग्ण आढळले होते तर 6 जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -ब्रेक द चेन अंतर्गत निर्बंध आदेश लागू
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 53 हजार 273 वर पोहोचली आहे. त्यातील 50 हजार 11 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आजरोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1464 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 1798 झाली आहे. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -