महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोल्हापुरात उतरणार ऑक्सिजनचे २६ टँकर, रेल्वेची जय्यत तयारी - रेल्वे प्रशासन

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा लवकर उपलब्ध व्हावा, या हेतूने केंद्र सरकारने रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात 26 टँकर ऑक्सीजन येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोल्हापुरात उतरणार ऑक्सिजनचे २६ टँकर
कोल्हापुरात उतरणार ऑक्सिजनचे २६ टँकर

By

Published : Apr 22, 2021, 2:32 AM IST

कोल्हापूर- महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा लवकर उपलब्ध व्हावा, या हेतूने केंद्र सरकारने रेल्वेने ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात 26 टँकर ऑक्सीजन येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोल्हापुरातील रेल्वे मार्केट यार्ड येथे युद्धपातळीवर काम सुरू असणार असून येत्या दोन दिवसात हे ऑक्सिजनचे टँकर कोल्हापुरात येण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात उतरणार ऑक्सिजनचे २६ टँकर

रेल्वे प्रशासनाकडून मार्केट यार्डात जय्यत तयारी

राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनचा पुरवठा देखील कमी पडू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रो रो सेवेअंतर्गत विशाखापटनम व भिलाई येथून महाराष्ट्र सरकारला ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसात राज्यात ऑक्सिजनचे टँकर येणार आहेत. राज्यात येणारे ऑक्सिजनचे टॅंकर पुणे आणि कोल्हापूर येथे उतरविण्यास सोयीस्कर ठरेल. असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात मार्केट यार्ड हे ऑक्सिजनचे टँकर उतरविण्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मार्केट यार्ड येथे जय्यत तयारी केली आहे. कोल्हापुरात 26 ऑक्सिजनचे टॅंकर येणार आहेत, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या 48 तासात कोणत्याही क्षणी हे टँकर कोल्हापुरात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा -आता एसटीची "महाकार्गो" ब्रँडने मालवाहतूक सेवा

ABOUT THE AUTHOR

...view details