महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ultimate Kho Kho 2022 : नाद खुळा! अल्टीमेट खो-खो स्पर्धेत कोल्हापूर-इचलकरंजीचे 22 खेळाडू मैदान गाजवणार

14 ऑगस्ट पासून अल्टीमेट खो-खो ( Ultimate Kho Kho 2022 ) स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध संघांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 22 खेळाडूंची निवड झाली आहे. तर त्यातील 16 खेळाडू हे फक्त इचलकरंजी शहरातील ( 22 Players From Kolhapur Ichalkaranji Play In Ultimate Kho Kho ) आहेत.

Ultimate Kho Kho 2022
Ultimate Kho Kho 2022

By

Published : Jul 20, 2022, 10:37 PM IST

कोल्हापूर - प्रो कबड्डी स्पर्धेच्या धर्तीवरतच आता अल्टीमेट खो-खो स्पर्धा ( Ultimate Kho Kho 2022 ) होत आहेत. येत्या 14 ऑगस्ट पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून, एकूण 6 संघामध्ये हे सामने होणार आहेत. एकीकडे क्रिकेटच्या आयपीएल आणि प्रो कबड्डीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता अल्टीमेट खो-खो सुद्धा होत आहेत. त्यामुळे या खेळातील खेळाडूंना सुद्धा आता मोठं व्यासपीठ मिळाले आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी विविध संघांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 22 खेळाडूंची निवड झाली आहे. तर त्यातील 16 खेळाडू हे फक्त इचलकरंजी शहरातील आहेत. त्यामुळे संपूर्ण देशभरातून इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच जिल्ह्यातून खेळाडूंची निवड होणारे कोल्हापूर एकमेव ठरले ( 22 Players From Kolhapur Ichalkaranji Play In Ultimate Kho Kho ) आहे.


खो-खो ची पंढरी, इचलकरंजी - कोल्हापूरातील इचलकरंजी शहर आणि इथल्या परिसराला खो-खो खेळाची पंढरी मानले जाते. या शहरात खो-खोचे जवळपास 7 क्लब आहेत. जातील प्रत्येक क्लब मध्ये जवळपास 100 खेळाडू सराव करत असतात. दररोज अखंडितपणे इथे प्रशिक्षक सराव घेत असतात. जे अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतात त्यामुळेच राष्ट्रीय स्थरावरील खेळाडू सुद्धा इथल्या प्रशिक्षकांनी घडवले आहेत. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या अल्टीमेट खो-खो स्पर्धेच्या निवड प्रक्रियेत 22 जणांनी सहभाग नोंदवला त्यातील सर्व 22 जणांची निवड झाली आहे. एवढ्या मोठ्या स्थरावर होत असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर आणि विशेष करून एकट्या इचलकरंजीमधील खेळाडूंची निवड झाल्याने शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याची प्रतिक्रिया येथील प्रशिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत. यातील विविध संघांमध्ये इचलकरंजी शहर व परिसरातील कोल्हापूर खो-खो असोसिएशनच्या संघांतून खेळलेले आणि खेळत असलेले तब्बल बावीस खेळाडू निवडले गेले. त्यामध्ये सोळा खेळाडू कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे, पाच खेळाडू मूळचे कोल्हापूर खो-खो असोसिएशनचे परंतु सध्या रेल्वेकडून खेळत असलेले ज्यामध्ये अमित पाटील, मझहर जमादार, विजय हजारे, निलेश पाटील आणि एक खेळाडू मूळचा कोल्हापूर खो-खो असोसिएशनचा परंतु सध्या छत्तीसगड संघाकडून खेळत असणारा विनायक पोकर्डे असे पाच जण आहेत. एकाच शहरातील खेळाडू इतक्या मोठ्या संख्येने निवडले जाणे ही बाब निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण व अभिमानास्पद आहे.

कोल्हापूर-इचलकरंजीचे खेळाडू



या स्पर्धेत असणार 120 खेळाडू आणि 6 संघ -या स्पर्धेला येत्या 14 ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये प्रारंभ होत असून, सहा संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 4 सप्टेंबर रोजी खेळली जाणार आहे. या स्पर्धेत 25 राज्यातून तब्बल 240 खेळाडू हे सहभागी होणार आहे. यातील 120 खेळाडूंचा या स्पर्धेत जे 6 संघ आहेत, त्यात निवड होणार आहे. देशात पहिल्यांदाच खो-खो अल्टिमेट देशपातळीवर ही स्पर्धा होणार असल्याने खेळाडूंमध्ये देखील उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. फ्रँचाइजींना एकूण 240 खेळाडूंमधून आपल्या संघासाठी कमाल 20 खेळाडूंची निवड करावी लागणार आहे. या स्पर्धेमुळे व्यावसायिकतेचा स्पर्श झालेल्या संपूर्ण नव्या रूपातील खो-खोचे दर्शन सर्वांना होणार आहे.

असे आहेत 6 संघ -

  1. चेन्नई क्विक गन्स (केएलओ स्पोर्ट्स)
  2. गुजरात जायन्ट्स (अदानी स्पोर्ट्सलाईन)
  3. मुंबई खिलाडीज (बादशाह आणि पुनीत बालन)
  4. ओडिशा जगरनॉट्स (ओडिशा राज्य शासन)
  5. राजस्थान वॉरिअर्स (कॅप्री ग्लोबल)
  6. तेलुगू योद्धाज (जीएमआर स्पोर्ट्स)

कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष म्हणजे इचलकरंजी शहरातील अल्टीमेट खो-खो मध्ये निवड झालेल्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे -


A कॅटेगरी

  1. अभिजित पाटील
  2. रोहन शिंगाडे
  3. रोहन कोरे
  4. राजवर्धन पाटील
  5. सुशांत हजारे

B कॅटेगरी

  1. अवधूत पाटील
  2. निलेश जाधव
  3. सागर पोतदार
  4. सौरभ आढावकर
  5. विजय हजारे

C कॅटेगरी

  1. अविनाश देसाई
  2. मनोज पाटील मनोज
  3. अमित पाटील
  4. आदर्श मोहिते
  5. अभिनंदन पाटील
  6. शैलेश संकपाळ
  7. मझहर जमादार
  8. विनायक पोकार्डे

D कॅटेगरी

  1. सुशांत कलढोणे
  2. निलेश पाटील
  3. प्रितम चौगुले
  4. प्रसाद पाटील

हेही वाचा -Over cooling off period : गांगुली आणि शहा यांना कोर्टाचा झटका: 'या' याचिकेवरील सुनावणी स्थगित

ABOUT THE AUTHOR

...view details