ठाणे - अनोळखी महिलेशी सोशल मीडियावर मैत्री करणे कल्याणातील एका तरुणाला चांगलेच महागात पडल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर मैत्री झालेल्या महिलेने या तरुणाला लग्नाचे आमिष आणि त्यानंतर कस्टमने पकडलेले सोने सोडविण्यासाठी त्या महिलेने तब्बल 14 लाख 96 हजार रूपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेसह तिच्या अन्य साथीदारांच्या विरोधात खडकपाडा पोलिसांना फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संकर भिमसेन ससमल (37) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.
कस्टम ऑफिसरच्या नावाने फसवणूक :कल्याण पश्चिमेत संकर भिमसेन ससमल हा तरुण राहतो. त्याची 19 एप्रिल ते 9 मे दरम्यान अनिता रंजन नामक महिलेने भारत मेट्रोमनीच्या ओरियामेट्रोमनी या अॅप्लीकेशनवर रजिस्टर केलेल्या प्रोफाइलवरून संकर ससमल यांच्याशी संपर्क साधला होता. संकर यांच्याशी या महिलेने मैत्री केली. त्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. संकर यांनीही या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. या महिलेने दिल्लीमध्ये कस्टम डिपार्टमेंटने पकडले आहे, असे भासवले. तिने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने आम्ही कस्टम ऑफिसर आहोत, अशी ओळख सांगून संकर ससमल यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला आणि त्यांना बँकेचा अकाऊंट नंबर पाठवून त्यांच्याकडून 14 लाख 96 हजार रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.