ठाणे - डोंबिवलीतील दोन मजली धोकादायक इमारतीचा अर्धा भाग कोसळल्याची घटना काल पहाटेच्या सुमारास घडली होती. मात्र, याच दुर्घटनाग्रस्त इमारतीत राहणाऱ्या एका १७ वर्षीय तरुणाच्या सतर्कतेमुळे इमारतीमधील राहणाऱ्या ७५ रहिवाशांचे जीव बचावल्याचे समोर आले आहे. कुणाल मोहिते असे या तरुणाचे नाव असून तो याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटूंबासह राहत होता.
असा आहे घटनाक्रम -
डोंबिवली पश्चिम कोपरमधील मुख्य रस्त्याला लागून मैना विठू निवास या नावाची दोन मजली इमारत ४२ वर्षे जुनी होती. लोडबेअरिंग पद्धतीने बांधण्यात आलेल्या या इमारतीमध्ये साधारण १४ कुटुंबातील सुमारे ७५ रहिवासी राहत होते. काल पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास इमारतीचा सज्जा कोसळला. त्यावेळी इमारतीमधील पहिल्या मजल्यावर राहणारा कुणाल मोहिते हा पहाटेपर्यंत टीव्ही पहात होता. त्यावेळी किचनच्या खिडकीतून त्याने आवाज ऐकला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसे त्या धोकादायक इमारतीमध्ये राहणारे रहिवासी लगेचच १० मिनिटात त्यांनी इमारतीच्या बाहेर पळ काढला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अन्यथा याठिकाणी मोठी जीवितहानी झाली असती. रात्रीपासूनच या इमारतीमध्ये माती कोसळण्यास सुरुवात झाली होती. परंतु, या रहिवाशांनी महापालिकेला कळवले नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
इमारत रिकामी करण्याची दिली होती नोटीस -