महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ulhasnagar Crime Branch : औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला अटक - वैजापूर पोलीस

औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( Rape on a minor girl ) करुन फरार झालेल्या आरोपीला कल्याणमध्ये ( Accused arrested from Kalyan East ) अटक करण्यात आली आहे. २०२१ मध्ये आरोपीने परिसरात रहाणाऱ्या एका अल्पवयीन पीडित मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तो पसार झाला. त्यावेळी त्याच्यावर वैजापूर पोलीस ठाण्यात भादवी ३७६, (२) (३) सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता.

पोलीस आयुक्तालय ठाणे
पोलीस आयुक्तालय ठाणे

By

Published : May 19, 2022, 6:29 PM IST

ठाणे - औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर पोलीस ठाण्यात बलात्कारासह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला कल्याण पूर्वेमधून ( Accused arrested from Kalyan East ) अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उल्हासनगर गुन्हे शाखेच्या ( Ulhasnagar Crime Branch ) पथकाला केली आहे. खळबळजनक बाब म्हणजे वर्षभरापासून तो फरार होता. सतीश उत्तम कनगारे ( वय ४२, रा. महात्मा फुलेनगर, वैजापूर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


आरोपी स्वतःची ओळख लपवून राहात होता चाळीत :आरोपी सतीश हा औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. २०२१ मध्ये त्याने त्याच परिसरात रहाणाऱ्या एका अल्पवयीन पीडित मुलीवर बळजबरीने अत्याचार करून तो पसार झाला. त्यावेळी त्याच्यावर वैजापूर पोलीस ठाण्यात भादवी ३७६, (२) (३) सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. मात्र तो कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागातील एका चाळीत स्वतःची ओळख लपवून राहात होता. विशेष म्हणजे वर्षभर तो याच परिसरात राहात असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस नाईक योगेश वाघ यांना मिळाली होती. तेव्हापासून त्याचा शोध त्यांनी सुरु केला. त्यातच १३ मे रोजी आरोपीचा ठावठिकाणा खडेगोळवली भागात मिळताच त्याला सापळा रचून उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.


आरोपी वैजापूर पोलिसांच्या कोठडीत :उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने वैजापूर पोलिसांची संपर्क करून आरोपीची माहिती दिली असता वैजापूर पोलिसांचे एक पथक उल्हासनगर गुन्हे शाखेच्या कार्यलयात दाखल होऊन त्यांनी आरोपीला अटक करून वैजापूर पोलीस ठाण्याच्या कोठडीत डांबल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे.

हेही वाचा -प्रियकराने व्हाट्सअप आणि मोबाईलनंबर ब्लॉक केल्याने तरुणीने केली प्रियकराच्या घरी आत्महत्या?

ABOUT THE AUTHOR

...view details