ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेल्वेत प्रवाशांच्या मुद्देमालावर डल्ला मारणारा सराईत चोरटा गजाआड - डोंबिवली

रेल्वेमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू हातोहात लांबविणाऱया एका सराईत चोरट्याला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले. चोरीचे एटीएम वापरणे चोरट्याला पडले महागात.

रेल्वेत प्रवाशांच्या मुद्देमालावर डल्ला मारणारा सराईत चोरटा गजाआड
author img

By

Published : Jul 20, 2019, 1:01 PM IST

ठाणे - रेल्वेमधील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू हातोहात लांबविणाऱया एका सराईत चोरट्याला डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केले. विशेष म्हणजे पोलिसांच्या तावडीत सापडलेला चोरटा आणखी एका प्रवाशाला लुटण्याच्या तयारीत होता. सिद्धाप्पा अजप्पा म्हेत्रे (वय 38, रा. एकता नगर, डोंबिवली पश्चिम) असे या चोरट्याचे नाव आहे.

in article image
रेल्वेत प्रवाशांच्या मुद्देमालावर डल्ला मारणारा सराईत चोरटा गजाआड


पंकज शिव कुमार पांडे (वय 31) हे दिवा पश्चिमेकडे असलेल्या मुंब्रा कॉलनी रोडला गुरु दर्शन नगर चाळीत राहतात. गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास, मुलुंड वरून अंबरनाथ लोकलने ते डोंबिवलीच्या दिशेने येत होते. डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर त्यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकिट गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पाकिटात 40 हजारांची रोकड आणि कोटक महिंद्रा बँकेचे एटीएम कार्ड होते. पंकज पांडे यांनी या प्रकरणात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, चोरट्याने या कार्डाचा वापर केल्यामुळे पाकिट हरवले नसून चोरी झाले असल्याची खात्री झाली.


वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. चव्हाण, एस. डी. परदेशी, एम. पी. भोजने, पी. जी. चव्हाण आणि जी. बी. पाठारे या पथकाने चोरट्यांना हुडकून काढण्यासाठी सर्वत्र जाळे पसरले. त्यासाठी कोटक महिंद्रा बँकेकडून घेतलेले एटीएम कार्ड सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेज मधील एक संशयिताचा चेहरा पाहून माहिती काढली असता, सिद्धाप्पा याच्याशी चेहरा मिळताजुळता आढळला.


हा इसम डोंगरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर येणार असल्याची खबर डोंबिवली रेल्वे पोलिसांच्या पथकाला मिळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून प्लॅटफॉर्मवरच त्याला ताब्यात घेतले. सिध्‍दप्‍पाला सीसीटीवी फुटेज आणि पोलीस खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरट्याला न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details