ठाणे -केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आक्षेपार्ह विधान केल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहे. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कल्याण डोंबिवलीतील शेकडो शिवसैनिकांकडून राणे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मंगळवारी कल्याण पूर्वेत नारायण राणेंच्या प्रतिकात्म पुतळ्याला चपलेचा हार घालत शिवसैनिकांनी आंदोलन केले. तर डोंबिवलीतील शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर समोरील चौकात शिवसैनिकांनी राणेंना 'कोंबडीचोर' असे म्हणत कोंबड्या उडविल्या आहेत. केंद्रीय मंत्री राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी शिव्यांची लाखोली वाहिली.
नारायणे राणेंच्या पुतळ्याला चपलेचे हार राज्यभरात विविध ठिकाणी शिवसैनिक आंदोलन करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या नेतृत्ताखाली राणेंच्या पुतळ्याला चपलेचा हार घालत जोरदार घोषणाबाजी केली. तर डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, राजेश कदम, युवा सेना पदाधिकारी राहुल म्हात्रे, सागर जेधे,अभिजित थरवळ, महिला आघाडी वैशाली दरेकर, मंगला सुळे व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
डोंबिवलीत 'कोंबडी चोर' म्हणत शिवसैनिकांचे आंदोलन काय म्हणाले होते नारायण राणे?
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते, की 'देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही', असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले.
Live बातमी वाचा-Maharashtra Breaking : नारायण राणे यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी सरकारी डॉक्टरांचे पथक दाखल
राणे सापडले अडचणीत...
स्थानिक पोलीस अधिक्षक नारायण राणेंना अटक करण्यासाठी पोहोचले आहेत. मात्र, त्यांच्याकडे अटक वॉरंट नाहीत. तसेच आमच्यावर दबाव आहे, असे पोलिसांनी म्हटले असल्याची माहिती जनआशीर्वाद यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार यांनी दिली.नारायण राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी करण्यास उच्च न्यायायलयाचा नकार दिला आहे. त्यामुळे राणे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
हेही वाचा-एवढीच तत्परता राज्य सरकार शर्जील उस्मानी प्रकरणामध्ये का दाखवत नाही? - देवेंद्र फडणवीस
हेही वाचाहे पंतप्रधानांचे वक्तव्य समजावे लागेल, जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला