महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक..! स्मशानभूमीतील शव गॅसदाहीनीच्या भडक्यात कामगार होरपळून जखमी - अंत्यसंस्कारात गॅसचा स्फोट झाल्याने एक जण जखमी

मृतदेहांवर अंत्य विधी करणाऱ्या स्मशानभूमीतील शव गॅस दाहीनीच्या भडक्यात एक कामगार होरपळून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवलीमधील पाथर्ली स्मशान भूमीमधील शव गॅस दाहीनी येथे घडली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Nov 21, 2021, 8:08 PM IST

ठाणे - मृतदेहांवर अंत्य विधी करणाऱ्या स्मशानभूमीतील शव गॅस दाहीनीच्या भडक्यात एक कामगार होरपळून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना डोंबिवलीमधील पाथर्ली स्मशान भूमीमधील शव गॅस दाहीनी येथे घडली आहे.

स्मशानभूमीतील शव गॅसदाहीनीच्या भडक्यात कामगार होरपळून जखमी

अंत्य विधी सुरू असतानाच घडली घटना

धक्कादायक बाब म्हणजे एका महिलेचे शव अंत्य विधी करण्यासाठी गॅस दाहीनीत असतानाच गॅस लीक होऊन घटना घडली आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा शव गॅस दाहीनीमुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचा हलगर्जीपणा समोर आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गोपाल आडसुळ असे गॅस दाहीनीच्या भडक्यात होरपळून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे.

जखमी कामगार अर्धातास स्मशानभूमीत उपचार विना पडून

डोंबिवली पूर्वेकडील पाथर्ली स्मशान भूमीमधील शव गॅसदाहीनीत शनिवारी (दि. 20) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास एक महिलेचे शव अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी आणला होते. त्यातच शव शव गॅसदाहीनीमध्ये ठेवताच अंत्य विधी सुरू असतानाच अचानक गॅस लीक होऊन भडका उडाला होता. त्यावेळी अंत्य विधी करणाऱ्या कंत्राटी कामगार त्या भडक्यामुळे गंभीर भाजून त्याचे तोंडाचा भाग जळाला. घटना घडताच त्या महिलेच्या नातेवाईकांनी अंत्य विधी सोडून त्या जखमी कामगाराला उपचारासाठी आदी रुग्णवाहिका चालकाशी संपर्क केला. मात्र, अर्धा ते पाऊण तास रुग्णवाहिका आली नसल्याचे पाहून अंत्य यात्रेत आलेल्या नागररिकानी त्या जखमी कामगाराला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात रिक्षात टाकून नेले होते.

शव गॅसदाहिनीचे बटन आणि लायटर नादुरुस्त

जखमी कामगाराला शास्त्रीनगर रुग्णालयात नेले असता डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमीला कळवा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, या घटनेवरून पुन्हा केडीएमसी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याचे समोर आले. तर शव गॅसदाहिनीचे बटन आणि लायटर गेली दहा दिवसांपासून बंद असल्याने ही घटना घडली असल्याची माहिती दहिनी ऑपरेटर अनिल जगताप यांनी दिली आहे.

हे ही वाचा -अपघात की घातपात? कार-पिकअपच्या भीषण अपघातात भाजपा नगरसवेकासह मित्राचाही मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details