ठाणे - कल्याण पूर्वेतील एका हॉटेलमध्ये एक कामगार समोसा तयार करण्यासाठी लागणारी मैदाची पुरी लाटून ती समोसा, पुरी तळणाऱ्याच्या घामाने भरलेल्या उघड्या मांडीवर ठेवतानाचा किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मराठा एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कोळसेवाडी पोलिसांकडे धाव घेऊन कारवाईसाठी लेखी तक्रार दाखल केली आहे.
मराठी एकीकरण समितीने केले समोसा तयार करतानाचे चित्रीकरण
रविवारी (17 ऑक्टोबर) मराठी एकीकरण समितीची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व कार्यकर्त्यांना अल्पोहार म्हणून समोस, व्हेफर्स, पेढा देण्याचे ठरले होते. त्यानुसार मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्याने कल्याण पूर्वेतील काटेमानेवली येथील शंकर हॉटेलच्या मालकाला आर्डर दिली होती. बैठक संपल्यावर कार्यकर्ते समोसे आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्यांना समोसा तयार करणाऱ्या एक कामगार पुरी लाटून तीच पुरी समोसा बांधून तळणाऱ्याच्या मांडीवर ठेवून समोसा तयार करत असल्याचे दिसून आले. यामुळे मराठी एकीकरण समितीने हॉटेल मालकाला दिलेली आर्डर रद्द करून किळसवाण्या प्रकाराचा मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.