कल्याण ( ठाणे) - कल्याण डोंबिवलीत कोरोनाची रुग्णसंख्या अत्यल्प असतानाही नविन कोविड सेंटर कशासाठी सुरू केली जात आहेत? कोविड सेंटर रुग्णांसाठी की कंत्राटदारांसाठी असे प्रश्न भाजप नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित करून कोविड सेंटरमधील होणाऱ्या भ्रष्टाचारावरून पुन्हा विरोधकांवर निशाणा साधला आहे. डोंबिवली जिमखान्यातील कोविड सेंटरची आज दुपारच्या सुमारास किरीट सोमैया यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरात सुरु असलेल्या कोविड सेंटरबाबत प्रश्न उपस्थित केले.
डोंबिवलीच्या जिमखान्यात सुरू करण्यात आलेल्या कोवीड सेंटरबद्दल आपल्याकडे तक्रारी आल्या होत्या. सुरुवातीच्या काळात कोविड सर्वोच्च पातळीवर होता. मात्र आता कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये तुलनेने घट झाली असून आम्ही कोविड सेंटरचे फायनान्शियल आणि परफॉर्मन्स ऑडिट सुरू केल्याची माहिती किरीट सोमैया यांनी यावेळी दिली. ठाण्यातील कोविड सेंटरपासून या ऑडिटला सुरुवात झाली असून पाहणी करण्यात आलेले हे पहिलेच सेंटर असल्याचे त्यांनी सांगितले.
कोविड सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे -