ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत गेल्या १५ दिवसापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आजही १८७ रुग्ण आढळून आल्याने महापालिका आयुक्तांनी कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पुन्हा लॉकडाऊन नको तर कोरोनाच्या नियमांच्या शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांसह शहरातील व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांना केले आहे.
कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त व्यापारी व हॉटेल व्यावसायिकांना इशारा
अनलॉक काळापासून शहरातील भाजीपाला मार्केट, हॉटेल , मंगलकार्य , बाजारपेठेत नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आहे. विशेषतः बहुतांश नागरिक कोरोनाच्या नियमाचे पालन न करताच शहारत कोरोनाचा प्रादुभाव वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे पालिका प्रशासनाच्या पहाणीत दिसून आले आहे. यामुळे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी खास करून व्यापारी आणि हॉटेल व्यवसायिकांना कोरोना नियमाचे पालन करण्याचे सांगून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिली आहे.
कोरोना रुग्णांची संख्या ६० हजाराच्या पुढे
गेल्या दिवसात शहरातील विविध भागात कोरोना रुग्ण जास्त संख्येने आढळून आले. अश्या १२ ठिकाणी कोरोनाचे हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले. तर आतापर्यत १२ च्या वर इमारतींमध्ये ५ रुग्णांच्यावर संख्या मिळाल्याने इमारतीचा परिसर सील करण्यात आला. आजही महापालिका हद्दीत १८९ रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे आतापर्यत रुग्णांची संख्या ६० हजार १७९ वर पोहचली आहे. तर १ हजार ५९४ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.