महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा कहर; गुरुवारी ५८० नव्या रुग्णांची भर - Kalyan dombivali latest news

शहरात गुरुवारी ५८० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात एकूण रुग्णसंख्या १० हजार ९३१ वर पोहोचली आहे. वाढत्या रुग्णांवर उपचार कुठे करायचा हा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे.

kalyan dombivali corona update
कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट

By

Published : Jul 10, 2020, 11:28 AM IST

कल्याण डोंबिवली(ठाणे)-शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून गुरुवारी ५८० रुग्ण आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रात एकूण रुग्णसंख्या १० हजार ९३१ वर पोहोचली आहे. केवळ २८ दिवसातच ९ हजार २३५ रुग्णांची झपाट्याने वाढ झाली. यामुळे रुग्णांवर उपचार करायचे कुठे?, असा प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

गुरुवारी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यासह उच्भू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले. शहरात आतापर्यंत १६४ जणांचा मृत्यू झाला असून ५ हजार ५४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल ५ हजार २१९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

गुरुवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्व १८७, कल्याण पूर्वेत १०३, कल्याण पश्चिममध्ये १७९,डोंबिवली पश्चिमेत ६९, टिटवाळा - मांडा १०, मोहने ३७ आणि पिसवली गावात ५ अशा ५८० रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रुग्णांच्या संख्येत २८ दिवसात झपाट्याने वाढ झाल्याचे रुग्णांच्या आकडेवारी वरून समोर आले आहे. १२ जून ते १९ जून या आठ दिवसाच्या कालावधीत १३१५ रुग्ण,२० जून ते २७ जूनपर्यंत या दिवसात २२९८ , २८ जून ते ५ जुलैपर्यत या आठ दिवसात तब्बल ३ ७७७, ६ जुलै ते ८ जुलै या तीन दिवसात १ हजार २६५ रुग्ण वाढले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details