महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण-डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे निधन - स्वाईन फ्ल्यू

कल्याणी पाटील यांना स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने ग्रासले होते. त्यातच आज त्यांचे निधन झाले आहे.

कल्याण डोंबिवलीच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे निधन

By

Published : Sep 10, 2019, 4:45 PM IST

ठाणे- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी महापौर कल्याणी पाटील यांचे ठाण्यातील जुपिटर हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी सात वाजता निघणार आहे.

हेही वाचा - रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! राजधानी आठवड्यातून आता चार वेळा धावणार

कल्याणचे विधानसभा सत्र संघटक शरद पाटील यांच्या त्या वहिनी आहेत. तसेच समाजसेवक नितीन पाटील यांच्या त्या पत्नी आहेत. स्वाईन फ्ल्यूच्या आजाराने त्यांना ग्रासले होते. त्यातच आज त्यांचे निधन झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details