ठाणे -कल्याण तालुक्यातील फालेगाव येथील सचिन स्टोन क्रशर या खडी केंद्रासाठी तब्बल ५ कोटी ९३ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणले. रिमोटद्वारे वीजवापर नियंत्रित करणारे सर्कीट मीटरमध्ये ( Circuit meter controlling power consumption by remote ) बसवून गेल्या २९ महिन्यांपासून क्रशरचालकाने ३४ लाख ९ हजार ९०१ युनिट विजेची चोरी ( 34 lakh 9 thousand 901 units of electricity stolen ) केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात क्रशर मालक व चालक असलेल्या पिता-पुत्राविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत गजानन भांबरे आणि सचिन चंद्रकांत भांबरे (रा. फालेगाव, ता. कल्याण) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
Electricity Theft Phalegaon : स्टोन क्रशरकडून तब्बल ५ कोटी ९३ लाखांची वीजचोरी; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल - पिता-पुत्राविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल मुंबई
रिमोटद्वारे वीजवापर नियंत्रित करणारे सर्कीट मीटरमध्ये ( Circuit meter controlling power consumption by remote ) बसवून गेल्या २९ महिन्यांपासून क्रशरचालकाने ३४ लाख ९ हजार ९०१ युनिट विजेची चोरी ( 34 lakh 9 thousand 901 units of electricity stolen ) केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात क्रशर मालक व चालक असलेल्या पिता-पुत्राविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरारी पथकाने फालेगाव येथील सचिन स्टोन क्रशरच्या (सर्व्हे क्रमांक १४९/१४) मीटरची ५ मे रोजी तपासणी केली. यात मीटरमध्ये छेडछाड केल्याचे व वीज वापराच्या नोंदी संशयास्पद असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले. त्यामुळे मीटर ताब्यात घेऊन प्रयोगशाळेत सखोल तपासणी करण्यात आली. यात मीटरमध्ये काळ्या रंगाची चिकटपट्टी गुंडाळून रिमोट कंट्रोल सर्किट बसवण्यात आल्याचे आढळले. रिमोट कंट्रोलच्या साह्याने हे सर्किट नियंत्रित करून क्रशरच्या प्रत्यक्ष वीजवापराची मीटरमध्ये कमी नोंद होईल, अशी व्यवस्था केल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झाले. डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ दरम्यान वीजचोरीचा हा प्रकार सुरू होता. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अन्वये आरोपींविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली आहे.
हेही वाचा -CCTV Video : पोलिसाने क्षणाचाही विलंब न करता थेट हात पकडून ओढले म्हणून... : लोकलसमोरील थरारक घटना!