ठाणे - डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरातील पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. वाहतूक नियंत्रण विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि कल्याण-डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचा टेम्पो रविवारी (दि. 1 ऑगस्ट) कोकणाकडे रवाना करण्यात आला.
वाहतूक पोलिसांनी मदत
अतिवृष्टी झाल्याने अचानक उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे चिपळूण भागातील अनेक गावांवर मोठे संकट ओढावले आहे. पावसामुळे डोंगर-कडे कोसळून गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गावकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेऊन डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण उपशाखचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, सहायक पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी व साईश ग्रुपच्या राजश्री पवार यांच्या संयुक्त विद्यमाने बाधित कुटुंबियांच्या मुलभूत गरजा भागवण्यासाठी पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांना केली. मदतीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या टेम्पोला ठाण्यातील तीन हात नाक्यावरून पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केला.
हेही वाचा -डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील इमारतीला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही