महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोपर उड्डाणपूल नोव्हेंबर अखेरपर्यंत, तर कल्याण दिशेकडील रेल्वेवरील पादचारी मार्ग 30 ऑगस्टपर्यंत होणार खुला - डोंबिवली बातमी

पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कल्याण दिशेकडील रेल्वेवरील पादचारी पुल येत्या 30 ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी खुला होणार आहे, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

bridge
bridge

By

Published : Jul 30, 2020, 6:41 PM IST

ठाणे - डोंबिवलीच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच डोंबिवलीकरांना येण्या-जाण्यासाठी अत्यंत महत्वाचा दुवा मानला जाणाऱ्या मध्य रेल्वे मार्गावरील नवीन कोपर उड्डाण पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहे. हा पूल नोव्हेंबर अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. तर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कल्याण दिशेकडील रेल्वेवरील पादचारी पुल येत्या 30 ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी खुला होणार आहे, असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

गुरुवारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कामाची पाहणी केली. याप्रसंगी कल्याण-डोबिंवली आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. या उड्डाण पुलाच्या परिसरातून जात असलेल्या विद्युत वाहिन्यांना पुश-थ्रूच्या माध्यमातून भूमिगत करण्याचे काम सुरु आहे. हे काम महिन्याभरात पूर्ण होईल. तसेच या उड्डाण पुलाच्या दोन पिलर उभारण्याचे काम सुरु असून या पुलाच्या गर्डरचे काम अहमदाबाद येथील कारखान्यात वेगाने सुरु आहे. पुलाची सर्व कामे वेळेत पूर्ण करुन हा पूल नोव्हेंबर अखेरपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच डोंबिवलीच्या पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कल्याण दिशेकडील रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचा देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आढावा घेतला.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील सर्व फलाटांना जोडून पूर्व-पश्चिमेला ये-जा करण्यासाठी नागरिकांसाठी महत्वाचा असलेल्या या पादचारी पुलाचे काम कोरोना व लॉकडाऊनच्या काळातही शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करत सुरु केले होते. आता पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून 30 ऑगस्टपर्यंत हा पूल नागरिकांकरिता खुला करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details