महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण संचारबंदीच्या काळात बेघर, गरजू नागरिकांना जेवणाच्या पॅकेटचे वाटप - बेघर नागरिक

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असेही आवाहन कल्याण -डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी केले आहे.

food disribute in kalyan
संचारबंदीच्या काळात बेघर, गरजू नागरिकांना जेवणाच्या पॅकेटचे वाटप

By

Published : Mar 26, 2020, 9:11 AM IST

ठाणे - कल्याण,डोंबिवली महापालिका क्षेत्रातील बेघर आणि गरजू नागरिकांना जेवणाच्या पॅकेट्सचे वाटप महापौर विनिता विश्वनाथ राणे यांच्यावतीने करण्यात येत आहे.

संचारबंदीच्या काळात बेघर, गरजू नागरिकांना जेवणाच्या पॅकेटचे वाटप

कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने खबरदारीचा उपाय म्हणून अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अशातच संचारबंदी असल्याने कोणीही बेघर आणि गरजू नागरिक उपाशी राहू नये, यासाठी महापौर विनिता राणे यांनी पालिका हद्दीतील बेघर आणि गरजू नागरिकांची परिस्थिती पाहता त्यांना जेवणाच्या पॅकेट्सचे वाटप करण्यात येत आहे.

संचारबंदीच्या काळात बेघर, गरजू नागरिकांना जेवणाच्या पॅकेटचे वाटप

दरम्यान, नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असेही आवाहन कल्याण -डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी केले आहे. तर, माणुसकीच्या नात्याने हा अन्न वाटपाचा उपक्रम लॉकडाऊन काळात म्हणजेच २१ एप्रिलपर्यत राबवणार येणार असल्याचेही महापौर राणे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details