ठाणे - कल्याण पूर्वेकडील क्रमांक 103 (कैलाश नगर) प्रभागाचा राडेबाज भाजपा नगरसेवक मनोज रामशकल राय याला कोळसेवाडी पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या. नगरसेवक राय कल्याण न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर दुसरीकडे कटकारस्थान रचून एका अपक्ष नगरसेवकाच्या खुनाची सुपारी दिल्याच्या आरोपांखाली तुरुंगात असलेल्या भाजपा नगरसेवक महेश पाटील याचाही जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नामंजूर केला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या येत्या काही दिवसात होणाऱ्या निवडणुका आदीच भाजपाला धक्के पे धक्का मिळाल्याने भाजपच्या गोटात पुन्हा खळबळ उडाली आहे.
नगरसेवकाच्या अडचणीत आणखी वाढ -
भाजपाला धक्के पे धक्का : सुपारीकांड नगरसेवकाचा जामीन नामंजूर - कल्याण-डोंबिवली महापालिका
कल्याण पूर्वेकडील क्रमांक 103 (कैलाश नगर) प्रभागाचा राडेबाज भाजपा नगरसेवक मनोज रामशकल राय याला कोळसेवाडी पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या आहेत. तर कटकारस्थान रचून एका अपक्ष नगरसेवकाच्या खुनाची सुपारी दिल्याच्या आरोपांखाली तुरुंगात असलेल्या भाजपा नगरसेवक महेश पाटील याचाही जामीन अर्ज उच्च न्यायालयाने नामंजूर केला
गेल्या निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर डोंबिवलीतील 82 (अंबिका नगर) प्रभागातून भाजपा नगरसेवक म्हणून महेश पाटील हे निवडणूक आले. काही महिन्यापूर्वी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येसाठी त्यांनी 1 कोटीची सुपारी दिल्याचे उघड झाल्याने तेव्हापासून कारावासात शिक्षा भोगत आहेत. त्यातच मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्याने त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे पाहवयास मिळाले आहे.
काय आहे प्रकरण ..
अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपाखाली भाजपाचा बाहुबली नगरसेवक महेश पाटील याला खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती. ठाणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी भिवंडीनजीक गणेशपुरी परिसरात झालेल्या दरोड्याप्रकरणी 8 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या शस्त्र साठ्यासह 3 लाख 40 हजारांची रोकड हस्तगत केली होती. चौकशीदरम्यान आरोपींपैकी एकाने नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येसाठी भाजपा नगरसेवक महेश पाटील याने तब्बल 1 कोटींची सुपारी दिल्याची कबुली दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी गणेशपुरी पोलीस ठाण्यात नगरसेवक महेश पाटीलसह इतर 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सद्या तुरुंगात असलेल्या भाजपा नगरसेवक महेश पाटील याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने पाटील याचा जामीन अर्ज नामंजूर केला. आरोपी महेश पाटील याच्यावतीने अॅड. कैलास देवल यांनी बाजू मांडली.
3 वर्षांपासून आरोपी नगरसेवक तुरुंगात ...
या संदर्भात नगरसेवक कुणाल पाटील यांच्यावतीने अॅड. सचिन थोरात आणि मनोज मोहिते हे काम पाहत आहेत. या संदर्भात अॅड. मोहिते माहिती देताना म्हणाले, गेल्या 3 वर्षांपासून आरोपी तुरुंगात आहे. 15-16 गंभीर गुन्हातला हा आरोपी जामिनावर सुटल्यास त्याच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. तसेच कुणाल पाटील यांच्या जीविताला धोका संभवतो. अशी व्यक्ती पुन्हा कट रचू शकते. त्यामुळेच आरोपी महेश पाटील याला कारागृहात ठेवणेच योग्य असल्याची कारणे पटवून देण्यात आल्याचे अॅड. मोहिते यांनी सांगितले.