महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डोंबिवली; इन्स्टाग्रामवर पीडितेशी मैत्री करून तिचा न्यूड फोटो व्हायरल करणाऱ्या विकृतावर गुन्हा दाखल - इन्स्टाग्रावर न्यूड फोटो व्हायरल

डोंबिवली पूर्वेकडील १८ वर्षीय तरुणीशी एका विकृताने इन्स्टाग्रामवर मैत्री करून पीडितेचा न्यूड फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

crime
crime

By

Published : Jan 16, 2021, 4:44 PM IST

ठाणे - सोशल मीडियावर सर्वाधिक गुन्हे अश्लील मेसेज अथवा व्हिडिओ क्लिप, न्यूड फोटो टाकून ते इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत, लैंगिक अत्याचार करण्याचे किंवा पैसे उकळण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. डोंबिवली पूर्वेकडील १८ वर्षीय तरुणीशी एका विकृताने इन्स्टाग्रामवर मैत्री करून पीडितेचा न्यूड फोटो, व्हिडिओ व्हायरल केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून त्या विकृतावर रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. अमनकुमार असे गुन्हा दाखल झालेल्या विकृत आरोपीचे नाव आहे.

पोलिसात तक्रारीची धमकी दिल्याने घडला प्रकार

सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून चॅटींग करताना आपली एक चूक किती महागात पडू शकते असे असंख्य उदारणे दररोज समाजाच्या समोर येऊनही तरुणाई या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार डोंबिवली पूर्वेकडील अयोध्यानगरीत एका इमारतीमध्ये राहणाऱ्या पीडित तरुणीसोबत घडला आहे. ऑगस्ट २०२० मध्ये पीडित तरुणी आजीकडे राहण्यास गेली होती. त्यावेळी आजीच्या मोबाईलवरील इन्स्टाग्रामवर आरोपी अमनकुमरशी ओळख होऊन मैत्री झाली झाली. त्यानंतर दोघेही इन्स्टाग्रामवर चॅटिंग करत असताना आरोपीने पीडितेला तुझा न्यूड फोटो मला इन्स्टाग्रामवर पाठव असा मेसेज केला. मात्र, पीडितेने त्याला नकार दिला होता. त्यामुळे विकृत आरोपीने तिला पोलीस ठाण्यात तुझी तक्रार देतो अशी धमकी दिली होती. या धमकीमुळे भयभीत होवून तिने आरोपीला तिचा नग्न अवस्थेतील एक फोटो, व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर मात्र पीडितेने घाबरून आरोपीचा इन्स्टाग्राम नंबर ब्लॉक करून टाकला होता.

इन्स्टाग्राम नंबर ब्लॉक केल्याने आरोपीने केला फोटो, व्हिडिओ व्हायरल

इन्स्टाग्राम नंबर ब्लॉक झाल्याचे पाहून विकृत आरोपीने पुन्हा पीडितेच्या आजीच्या व्हॉट्सअ‌ॅप नंबरवर वारंवार अश्लील मेसेज पाठवून पीडितेला त्रास देत होता. त्यातच आजीच्या घरी पीडितेचा आत्ये भाऊ आला असता, त्याला त्या मोबाईल व्हॉट्सअ‌ॅपवर आरोपीने केलेल्या पोस्ट दिसल्या. त्यामुळे आरोपीला त्याने त्याच्या मोबाईलवरून कॉल करून सांगितले की, माझ्या बहिणीला त्रास देऊ नको, असे सांगताच आरोपीने तुझ्या बहिणीचे काही फोटो, व्हिडिओ माझ्याकडे आहे. ते तुला शेअर करतो. असे सांगून आत्ये भावाच्या मोबाईलवर न्यूड फोटो व्हायरल केला. त्यानंतर ही गंभीर बाब जेव्हा घरच्यांना माहिती पडताच त्यांनी पीडितेला घेऊन रामनगर पोलीस ठाणे गाठत विकृत अमनविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात ३४५(ड), ६६(ई), ६७(अ) कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details