महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Dombivli Crime : दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याच्या वादातून प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या - प्रियकराने केली आत्महत्या

डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या कासारीआ गोल्ड संकूलमधील ( Casaria Gold Complex Murder Case ) प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आहे. त्यानंतर त्याने स्वत:ही आत्महत्या केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ( Manpada Police Station ) मृतक प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अनिल मधुकर साळुंखे (वय- 33) असे प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तर ललीता सुरेश काळे ( वय-28 ) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.

मानपाडा पोलीस
मानपाडा पोलीस

By

Published : May 31, 2022, 3:52 PM IST

Updated : May 31, 2022, 5:30 PM IST

ठाणे - प्रेयसीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याच्या वादातून प्रेयसीची हत्या करून प्रियकराने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील हायप्रोफाईल वस्ती असलेल्या कासारीआ गोल्ड संकूलमधील ( Casaria Gold Complex Murder Case ) एका इमारतीच्या बेडरूममध्ये घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात ( Manpada Police Station ) मृतक प्रियकरावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. अनिल मधुकर साळुंखे (वय- 33) असे प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. तर ललीता सुरेश काळे ( वय-28 ) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.



प्रियसीचा गळा आवळून त्याच नायलॉन दोरीने स्वतःही घेतला गळफास :मृतक अनिल हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील चांदवडमधील वडनेर गावाचा रहिवाशी होता. तर हत्या झालेली ललीता ही डोंबिवली पूर्वेतील कासारीआ गोल्ड संकूलमध्ये राहत होती. या दोघांमध्ये प्रेम संबध होते. त्यातच ललीताने दुसऱ्या तरुणाशी लग्न करण्याचा निर्णय घेवून त्या तरुणासोबत कुंकवाचा कार्यक्रम केला. याच गोष्टीचा राग मनात धरून मृत ललीताला शेवटचे भेटण्याचा बहाणा करून तिच्या राहत्या २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आला होता. त्यानंतर तिच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये दोघे सोबत झोपला असतांना मध्यरात्रीच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतुन कडी लावून बंद केला. त्यानंतर ललीताच्या गळ्या भोवती नायलॉन दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतः त्याच नायलॉनच्या दोरीने फास घेवून आत्महत्या केली.


३० मे रोजी समोर आली घटना :सकाळी दुसऱ्या दिवशी बराच वेळ झाला बेडरूमचे दार आतून बंद असल्याचे मृतकच्या बहिणीला दिसले. त्यामुळे तिने घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. तर घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघांचे मृतदेह शविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले होते. याप्रकरणी मृतक ललिताची बहीण अनिता हिच्या तक्रारीवरून मृतक प्रियकर अनिल याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. लांडे करीत आहेत.

हेही वाचा -Nagpur Crime : गोळीबार झालेल्या शेख शकीलची तब्येत धोक्याबाहेर, एक संशयित आरोपी ताब्यात

Last Updated : May 31, 2022, 5:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details