महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पीडितेच्या इंस्टावर अश्लिल फोटो पाठवून ऍसिड फेककण्याची धमकी, भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलीस कोठडी - ठाणे जिल्हा बातमी

कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकाने कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीच्या इंस्टाग्रामवर अश्लील मेसेजसह फोटो पाठवून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेककण्याचीही धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. या प्रकरणी पीडित तरुणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले असता 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप गायकर (वय 45 वर्षे), असे पोलीस कोठडीत असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.

corporator
माजी नगरसेवक

By

Published : Nov 30, 2021, 3:39 PM IST

ठाणे - कल्याण डोंबिवली महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकाने कल्याणमध्ये राहणाऱ्या एका तरुणीच्या इंस्टाग्रामवर अश्लील मेसेजसह फोटो पाठवून तिच्या चेहऱ्यावर ऍसिड फेककण्याचीही धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. या प्रकरणी पीडित तरुणीने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होताच फरार झालेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाला पोलिसांनी अटक करून आज न्यायालयात हजर केले असता 3 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संदीप गायकर (वय 45 वर्षे), असे पोलीस कोठडीत असलेल्या भाजपच्या माजी नगरसेवकाचे नाव आहे.

माहिती देताना विधीज्ञ

पीडितेच्या चारचाकी वाहनाचा करत होता पाठलाग...

पीडित तरुणीशी मैत्री करून तिच्याशी ओळख निर्माण केली. त्यानंतर सन 2019 ते 6 सप्टेंबर, 2021 या दोन वर्षांपासून आरोपी माजी नगरसेवक संदीप गायकर याने पीडितेला कल्याणच्या अनेक रस्त्यांवर अडवून त्रास दिला. तो वेळोवेळी तिच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग करून तिची समाजात व नातेवाईकात बदनामी करण्याची धमकी देत होता. तसेच तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकून चेहरा खराब करीन व मित्र परिवारासही सोडणार नाही, असे म्हणत शिवीगाळ करत होता, अशी तक्रार पीडितेने दिली आहे.

अश्लील मेसेज व फोटो टाकून व्हाट्सअपवर बदनामी...

सप्टेंबर, 2021 च्या महिन्यात तर भर रस्त्यामध्ये पीडितेचा हात पकडून तिच्या चेहऱ्यावर बोचकरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून विनयभंग केल्याचा आरोप पीडित तरुणीने तिच्या तक्रारीत केला होता. तसेच तिच्या जुन्या इंस्टाग्राम अकाउंटवर अश्लील मेसेज व फोटो टाकून सोशल मीडिया अकाउंट आणि व्हाट्सअॅपवर बदनामी केली असल्याचा आरोपही पीडित महिलेने आपल्या फिर्यादीत नमूद केले होते.

जामिनीसाठीही आरोपी नगरसेवकाने केले प्रयत्न...

आरोपी माजी नगरसवेक गायकरवर 26 सप्टेंबर, 2021 रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पीडित महिलेने विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच आरोपीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज ना मंजूर केला होता.

हे ही वाचा -Rape on Minor Girl : कारागृहात बंद असलेल्या आईला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार

ABOUT THE AUTHOR

...view details