ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 30 जून) घेतला होता. त्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते बांबू आणि लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने सील करण्याची तयारी महापालिका व पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे.
कल्याण डोंबिवलीत पुन्हा 'लॉकडाऊन', प्रशासन लागले कामाला - कल्याण डोंबिवली प्रतिबंधित क्षेत्र
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे पालिका हद्दीत पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचा नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका व पोलीस प्रशासनाने म्हटले आहे.
प्रतिबंधित क्षेत्र