ठाणे - 'त्यांचा' सगळा वेळ राजकारणातच असतो, मात्र आम्ही राजकारण निवडणुकीपुरतं करतो, असा टोला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. कल्याणच्या बहुप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. महाविकास आघाडीवर टीका करणाऱ्या विरोधीपक्षाला त्यांनी लक्ष्य केले. पत्री पुलावरून याआधीही राजकारण झाले आहे. मात्र, आम्ही तसे करणार नाही, असे ठाकरे म्हणाले.
"त्यांचा सगळा वेळ राजकारणातच"; आदित्य ठाकरेंचा विरोधकांना टोला - patripul bridge girder news
कल्याणच्या बहुप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आले होते. यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला.

विकासकामांद्वारे राज्याला पुढे नेण्याचे काम
विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करत असल्याचे ठाकरे म्हणाले. कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पत्रीपूल हा मोठा प्रश्न होता. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. रेल्वेकडून मेगाब्लॉक मिळाल्यानंतर पत्रीपुलाच्या गर्डरचे काम सुरू झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची कामे सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये विकासकामांनी वेग घेतला असून 'आम्ही राजकारण निवडणुकीपुरतं करतो', असा टोला त्यांनी लगावला.