ठाणे - राज्यात १३ महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहे. यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेचाही समावेश असून यंद्याच्या महापालिका निवडणुकीच्या ( Kalyan Dombivali Municipal Election ) रणधुमाळीत 'आप'चा झाडूही नागरिकांच्या ( AAP contest elections ) समस्या घेऊन मैदानात ताकतीने उतरणार असल्याची घोषणा कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्राचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष धनंजय जोगदंड ( AAP Leader Dhananjay Jogdand ) यांनी केली आहे. नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत घरोघरी जाऊन आपकडून संवाद साधला जात आहे. येणाऱ्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरु असून केडीएमसीच्या ४४ प्रभागांमध्ये १३३ नगरसेवक उभे करण्याचा मानस असल्याचे आम आदमी पार्टीचे धनंजय जोगदंड यांनी व्यक्त केला आहे.
'आप'चा असा असेल जाहीरनामा :गेली २४ वर्षे कल्याण डोंबिवली महापोलीकेत शिवसेना भाजपाची सत्ता आहे. असे असताना देखील नागरिकांना नागरी सुविधांसाठी पायपीट करावी लागत आहे. गेल्या महिन्या भरापासून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम आणी डोंबिवली भागात घरो घरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. यात महत्वाचे म्हणजे काही भागात अजूनही कर भरणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तर काही भागात अजूनही पाणी चोरी आणि पाणी गळतीचे प्रकार समोर येत असतात. त्यामुळे जर या केडीएमसीच्या निवडणुकीत निवडणूक आले तर दिल्लीप्रमाणे पाणी मोफत देण्याची आमची मनशा असल्याचे जोगदंड यांनी संगीतले. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेने फेरीवाला धोरण अद्याप तयार केलेले नाही. एकीकडे ओपन लँड टॅक्स कमी करून बिल्डर्सना मदत केली तर दुसरीकडे करदात्या नागरिकांच्या मालमत्ता करत मात्र कपात केलेली नाही. हा दुजाभाव हा केडीएमसीच्या व्यवहारात दिसून येत आहे. वाहतूक कोंडीच्या समस्यामुळे नागरिकान नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.