महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत ‘कमळ’ कोमजण्याच्या मार्गावर, 6 नगरसेवकांचे शिवबंधन - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

कल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. मागील काही वर्षांपासून कडोंमपावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.

kalyan dombivli muncipal corporation
kalyan dombivli muncipal corporation

By

Published : Nov 22, 2021, 3:25 PM IST

ठाणे : कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने भाजपला धक्का दिला आहे. भाजपचे विद्यमान पाच ते सहा नगरसेवकासह शेकडो कार्यकर्ते आज (सोमवारी) राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे दुसरीकडे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून भाजपच्या स्थानिक आमदारांनी पक्ष प्रवेशावर प्रतिक्रिया देत, 'आम्ही कुठे तरी कमी पडलो' अशी खंत व्यक्त करत, नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

6 नगरसेवकांचे शिवबंधन
शक्तिप्रदर्शन करीत दणक्यात होणार पक्ष प्रवेशकल्याण डोंबिवली महापालिकेची मुदत संपल्याने सध्या प्रशासकीय राजवट लागू आहे. मागील काही वर्षांपासून कडोंमपावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. या वर्चस्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात येऊ लागल्यानं पुन्हा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. यातच आता डोंबिवलीतील माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सुनीता पाटील आणि सायली विचारे हे सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासोबतच परिवहन सदस्य संजय राणे, खोणी ग्रामपंचायत सदस्य हनुमान ठोंबरे यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्तेदेखील सेनेत प्रवेश करणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे. पक्ष प्रवेशापूर्वी गाड्यांच्या ताफ्यासह मोठं शक्तिप्रदर्शन देखील केलं जाणार आहे. त्यामुळे भाजपाच्या बालेकिल्ल्यासह ग्रामीण भागात सेना आपल्या धनुष्यबाणानं कमळाला आज घायाळ करणार आहे. आता, या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीत अधिक राजकीय उलथापालथ घडण्याची शक्यता आहे.भाजपा आमदारांनी व्यक्त केली खंतभाजप नगरसेवकांच्या प्रस्तावित शिवसेना प्रवेशावर भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी 'आम्ही कुठे तरी कमी पडलो' अशी खंत व्यक्त केली आहे. याचबरोबर या नगरसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आम्हालाही आपल्याकडूनच या प्रवेशाबाबत समजलं आहे. भाजपचे कार्यकर्ते, एवढी वर्षे ज्यांनी पक्षात काम केले असे काम करणारे कार्यकर्ते सोडून जातात. त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख होत असल्याचे ते म्हणाले. तर भारतीय जनता पक्ष ते का सोडून चालले आहेत, याचे कारण त्यांनाच माहीत असावे. मात्र आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना दुःख वाटते की आम्ही कुठे तरी कमी पडलो की काय? अशी खंतही आमदार चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. कडोंमपामध्ये पक्षीय बलाबल काय ?कल्याण-डोंबिवली महापालिकेत 122 जागा असून त्यापैकी 52 जागा ह्या शिवसेनेकडे आणि भाजपकडे 42 जागा आहेत. काँग्रेसकडे 4, राष्ट्रवादीकडे 2, मनसेकडे 9, एमआयएमकडे 1 आणि 10 जागा अपक्षांकडे होत्या. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे राज्यातील सत्तेत असतानाही स्वतंत्रपणे लढले होते. भाजपने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जोरदार मुसंडी मारली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये कल्याणमधील 27 गावांचा समावेश आहे. सध्या याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायलयाच्या निर्णयावर कडोंमपाची प्रभाग रचना ठरणार आहे.हेही वाचा - Param Bir Singh : सर्वोच्च न्यायालयाकडून परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण

ABOUT THE AUTHOR

...view details