ठाणे -गेल्या दोन वर्षाच्या काळात कोरोनाच्या संकटामुळे सर्वच धर्मियांचे सण - उत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले. यंदाच्या वर्षात कोरोना आटोक्यात आल्याने दहीहंडी उत्सव Dahi Handi festival 2022 धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यासाठी महिला गोविंदाची पथके Mahila Govinda squads सज्ज झाली असून घर, नोकरी सांभाळून ह्या महिला, तरुणी दहीहंडीचा सराव करीत आहेत. विशेष म्हणजे कल्याण - डोंबिवली शहरात जवळपास २०० महिला - तरुणी विविध गोवींदा पथकात सहभागी झाल्या आहेत.
८० तरुणीचे गोविंदा पथक :एकेकाळी गोविंदा पथके म्हटली की, पुरुषांची मक्तेदारी असयाची. मात्र आता पुरुषांप्रमाणेच महिला गोविंदा पथके देखील उंचच उंच थर लावण्यात पटाईत झाल्या आहेत. त्यासाठी सर्वच गोविंदा पथक देखील सज्ज झालेली आहेत. कल्याण डोंबिवलीतील पुरुष गोविंदा पथकासह महिला गविंदा पथकांनी देखील कोरोनामुळे गेली दोन वर्ष गोविंदा पथकांमध्ये आलेली मरगळ झटकत सरावाला सुरुवात केली आहे. कल्याण पश्चिम भागातील वायले नगर मैदानात शिक्षिका, ऑपरेटर, क्लार्क असलेल्या आणि गृहिणी असलेल्या सुमारे ८० महिला - तरुणीचे गोविंदा युवाराष्ट्र महिला गोविंदा पथक दहीहंडीचा सराव करत आहेत. या गोंविदानी दहीहंडीचे मनोरे रचण्यासाठी चक्क आपल्या कामातून सुट्टी घेतली आहे.