महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परवानगी १२ मजली इमारतीची, उभे केले २० मजली; माहितीच्या अधिकारातून प्रकार उघड - परवानगी १२ मजली इमारतीची उभे केले २० मजली

महापालिकेने परवानगी १२ मजल्याची दिल्याने त्यानुसार इमारतीचा पाया (फॉऊंडिशन) उभारण्यात आला. मात्र तक्रारदार कुरेशी यांच्या माहितीनुसार याच इमारतीच्या पायावर (फॉऊंडिशन) ८ मजले केवळ ७ महिन्यात उभारण्यात आले. विशेष म्हणजे बांधकाम नियमानुसार ८ मजले उभारण्यासाठी २० महिन्याचा कालावधीत लागत असल्याची माहिती कुरेशी यांनी दिली आहे.

अनधिकृत बांधकाम केलेली इमारत
अनधिकृत बांधकाम केलेली इमारत

By

Published : Apr 1, 2022, 7:50 PM IST

Updated : Apr 1, 2022, 8:11 PM IST

ठाणे -कल्याण पश्चिम भागातील गौरीपाडा येथे चौधरी डेव्हलपर्स व इतर बांधकाम व्यवसायिकांनी १२ मजल्याची इमारत बांधकाम परवानगी असताना त्यावर ८ मजली अनधिकृत उभारल्याचे माहिती अधिकारातून उघड झाल्याची माहिती तक्रारदार जहीर अहमद अब्दुल हमिद कुरेशी यांनी दिली आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या संबधित विभागाकडे ८ मजले निष्कासित करण्यासाठी त्यांनी तक्रार अर्ज दिला आहे.

प्रतिक्रिया देताना तक्रारदार आणि अधिकारी



चार महिन्यात शेकडो अनधिकृत बांधकामे उध्दवस्त :कल्याण डोंबिवली अनधिकृत बाधंकामचे जणू माहेरघर बनवले आहे. कोरोनाच्या २ वर्षात हजारो अनधिकृत बांधकामे उभी राहिल्याच्या तक्रारी, शिवाय महापालिका प्रशासनाने गेल्या चार महिन्यात शेकडो अनधिकृत बांधकामे उध्दवस्त केली आहे. तरीही काही अनधिकृत बांधकामे सुरूच असून असेच गौरीपाडा येथील सर्व्हे न. ५५/३, ४१/११, ४२/१/१अ , ४२/१/ब, या मिळकतीवर कल्याण डोंबिवली महापापालिकेच्या नगररचना विभागाने २०२१ साली १२ मजल्याची इमारत उभारण्यासाठी परवानगी दिली. मात्र चौधरी डेव्हलपर्सचे भागीदार शशिकांत चौधरी, कपिल पटेल व इतर यांनी ८ मजले अनधिकृतपणे उभारल्याची लेखी तक्रार जहीर कुरेशी यांनी पालिका आयुक्त व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाला दिली आहे.



७ महिन्यात ८ मजले उभे :महापालिकेने परवानगी १२ मजल्याची दिल्याने त्यानुसार इमारतीचा पाया (फॉऊंडिशन) उभारण्यात आला. मात्र तक्रारदार कुरेशी यांच्या माहितीनुसार याच इमारतीच्या पायावर (फॉऊंडिशन) ८ मजले केवळ ७ महिन्यात उभारण्यात आले. विशेष म्हणजे बांधकाम नियमानुसार ८ मजले उभारण्यासाठी २० महिन्याचा कालावधीत लागत असल्याची माहिती कुरेशी यांनी दिली आहे. यामुळे भविष्यात इमारत कोसळून या इमारतीत सदनिका घेणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता कुरेशी यांनी व्यक्त केली आहे.



'खातरजमा करून पुढील कार्यवाही करणार' :याबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालक श्रीमती दिशा सावंत यांच्याशी संपर्क साधला असता सदर विकासकाला १२ मजल्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर सुधारित आराखडा नुसार ८ मजले उभारण्यासाठी नगररचना विभागाची परवानगी घेण्या आधीच त्यांनी १२ मजल्यावरच अधिक ८ मजले असे बांधकाम उभारले आहे. त्यामुळे कुरेशी यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महापालिका नगरचना नियमानुसार संबंधित इमारतीची खातरजमा करून पुढील कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे तक्रारदार कुरेशी यांनी जानेवारी २०२२ पासून आजपर्यत महापालिकेसह विविध ठिकाणी तक्रारी अर्ज दिले आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीवर महापालिका काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा -Mumbai Metro Inauguration : मुंबई मेट्रोचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर भाजपकडून बॅनर

Last Updated : Apr 1, 2022, 8:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details