ठाणे : देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येत आहे. त्यातच नवरात्रीचा उत्सव तृतीयपंथिही देवीचा जागर करून देवीची उपासना करीत आहेत. विशेष म्हणजे गेल्या १४ वर्षांपासून शेकडो तृतीयपंथीय एकत्र येत हा देवीचा जागर मोठ्या भक्ती भावाने साजरा करीत असल्याची त्यांची परंपरा दिसून आली आहे.
कल्याण पूर्वेतील पत्रीपूल नजीक असलेल्या काचोरेगाव येथील नवी गोविंदवाडी तृतीयपंथीय मोठ्या समूहांची वस्ती आहे. या वस्तीत राहणाऱ्या तृतीयपंतीयांकडून नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच दुर्गा देवीची मनोभावे पूजा अर्चना करण्यात येते. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोंनाचा सामना सर्वांनाच करावा लागला. त्यातच तृतीयपंथी समाजालाही लॉकडाऊनमुळे आर्थिक फटका बसला आहे. यामुळे समाजावरील कोरोनाचे संकट कायमस्वरूपी दूर व्हावे, याकरिता त्यांनी देवीकडे साकडे घातले.
तृतीयपंथीयांचा समाज एकत्र आणण्याचा प्रयत्न